जम्मू आणि काश्मीर Terrorist Attack Air Force Convoy : जम्मू आणि काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात शनिवारी दहशतवाद्यांनी भारतीय हवाई दलाच्या (एआयएफ) ताफ्यावर हल्ला केला. या हल्ल्यात भारतीय हवाई दलाच्या जवानाचा मृत्यू झाला. तर आणखी एका जवानाची प्रकृती चिंताजनक आहे. तर तिघांची प्रकृती स्थिरी असल्याचं सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यानं सांगितलं. स्थानिक राष्ट्रीय रायफल्सच्या तुकडीनं परिसरात शोधमोहिम सुरू केली आहे. सैन्यदलानं परिसरात गस्त आणि वाहनांची तपासणी वाढवली आहे.
दहशतवादी हल्ल्यात जवान जखमी :सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, "भारतीय सैन्याचे पाच जवान या हल्ल्यात जखमी झाले आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, "सुरनकोटच्या सनई गावात गोळीबार झाल्याची माहिती मिळाल्यानंतर भारतीय सैन्य तसंच पोलिसांचे जवान प्रभावित भागात पाठवण्यात आले आहेत. सध्या शोध मोहीम सुरू आहे."
कुठे झाला हल्ला? : शोध मोहिमेत मदत करण्यासाठी भारतीय सैन्य आणि पोलिसांच्या इतर तुकड्या या भागात पाठवण्यात आल्या आहेत. हा हल्ला सुनारकोटच्या सेनाई गावात झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला शनिवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास झाला. हल्ल्यानंतर भारतीय जवानांनीही दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिलं. उल्लेखनीय आहे की, अनंतनाग-राजौरी-पुंछ लोकसभा मतदारसंघात 25 मे रोजी मतदान होणार आहे. जखमी जवानांना उपचारासाठी उधमपूर येथील सैनिक रुग्णालयात नेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. या सर्वांवर डॉक्टरांचे विशेष पथक उपचार करत आहे.