हैदराबाद Stomach Gastric Problem : धावपळीच्या जीवनात अनेकांचे सकस आहाराकडे दुर्लक्ष होत आहे. तसंच आहार बदलामुळे पोटाशी संबंधित अनेक समस्या उद्भवत आहेत. त्यातील एक सामान्य समस्या म्हणजे पोटात उत्पन्न होणारा गॅस आहे. अनेक वेळा अकारण खाण्यानं पोटफुगी, आंबट ढेकरसारख्या समस्या समोर येतात. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डायबिटीज अँड डायजेस्टिव्ह अँड किडनी डिजीज, यूएसएमध्ये प्रकाशित झालेल्या लेखानुसार, काही परिस्थितींमध्ये लोकांना आहाराची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. खाण्याच्या काही सवयी बदल्यास आपण या समस्येतून सुटका मिळवू शकतो. त्यासाठी काय करावे जाणून घेऊयात.
गॅसची समस्या टाळण्यासाठी काय करावं-
- च्युइंग गम, हार्ड कँडी चघळणे, सॉफ्ट ड्रिंक पिणं टाळलं पाहिजे.
- जेवण करताना किंवा इतर वस्तू खाताना बोलू नये.
- काहीही खाताना शक्य तेवढं सावकाश खावं.
- कर्बोदकयुक्त पदार्थ आणि पेयांमुळे गॅसची समस्या उद्भवते. त्यामुळे शक्यतो ते पिणे टाळावे.
https://www.niddk.nih.gov/health-information/digestive-diseases/gas-digestive-tract/eating-diet-nutrition
- तुमच्या आहारात बदल करा :काही लोक कार्बोहायड्रेट खातात. पोट आणि लहान आतडे हे पूर्णपणे पचवू शकत नाहीत. त्यामुळे गॅसची लक्षणे जास्त उद्भवतात. त्यामुळे खाली पदार्थ टाळावे.
गॅसची समस्या असल्यास आहारात काय बदल करावा?
- फळांचा रस घेणं टाळा. उदा. सफरचंद खाणे टाळावं
- आहारामध्ये ब्रोकली, फुलकोबी, शेंगा आणि वाटाणांचा समावेश टाळावा.
- शेंगा-बीन्स, वाटाणे आणि मसूर यांचा आहारात मर्यादित वापर करावा.
- दूध, आइस्क्रीम आणि दहीदही असे दुग्धजन्य पदार्थ टाळावेत.
गॅसच्या समस्येसाठी विशेष आहार : तुम्हाला गॅसची समस्या असेल तर ती समस्या रौद्ररूप धारण करण्यापूर्वीच डॉक्टर किंवा आहारतज्ञांशी संपर्क करावा. तज्ज्ञांच्या मदतीने सेलियाक रोग - (अतिसार, पोटात गोळा येणे, गॅस होणे) यावर उपचार करण्यासाठी ग्लूटेनमुक्त आहाराचे नियोजन करावे. लॅक्टोजची आणि फ्रॅुक्टोजचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी आहाराचे योग्य प्रमाण ठेवावे.
(Disclaimer- या लेखामधील माहिती केवळ माहितीस्तव देण्यात आलेली आहे. कोणतेही उपचार किंवा आहारातील सूचनांचे पालन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे)
हेही वाचा
- व्यायाम न करता निरोगी राहायचं? मग नियमित चालावित एवढी पावलं, वाचा चालण्याचे फायदे - Benefits Of Walking
- शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण किती असावं? सीएसआयची नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी - New guidelines on blood cholesterol
- डॉक्टर दिनानिमित्त इतिहास, थीम आणि महत्त्व जाणून घ्या... - national doctors day 2024