ETV Bharat / politics

मविआच्या पराभूत उमेदवारांची 'ईव्हीएम'वर शंका; भरले लाखो रुपये

विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीनंतर राज्यभरातून इव्हीएमवर शंका घेतल्या जात आहेत. महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवारांकडून ईव्हीएम तपासणी व पडताळणीची मागणी केली जात आहे.

EVM CHECKING VERIFICATION
ईव्हीएम मशीन (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 2 hours ago

मुंबई : राज्यात नुकत्याचं झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं आहे. तर दुसरीकडे विरोधकांनी ईव्हीएम विरोधात आवाज उठवला आहे. अश्यातच पुण्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रशांत जगताप, अणुशक्ती नगर मतदारसंघातील फहाद अहमद आणि मुंबईतील चांदिवली मतदारसंघातील कॉंग्रेसचे आरिफ नसीम खान या पराभूत उमेदवारांनी ईव्हीएम तपासणी व पडताळणीसाठी पैसे भरले आहेत.

लोकशाही वाचवण्यासाठीची लढाई : याबाबत प्रशांत जगताप म्हणाले, "निवडणूक आयोगाच्या अधिकारानुसार, हडपसर मतदारसंघातील ईव्हीएम मशीनमधील छेडछाड तसंच टेक्नॉलॉजीद्वारे केलेले बदल समोर येत आहे. पाच टक्के मशीन पाहण्याचा अधिकार उमेदवाराला असतो. काल अधिकृत रित्या ईव्हीएम तपासणी व पडताळणीसाठी 12 लाख 74 हजार रुपये भरले. तसंच व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम मशीनमधील आकडा समान आहे का? हे पाहणार. लोकशाही वाचवण्यासाठीची लढाई असून ही लढाई कायदेशीर तसंच रस्त्यावर येऊन आम्ही लढणार आहोत. ईव्हीएममध्ये झालेला गैरप्रकार समोर आणणार."

प्रशांत जगताप यांची प्रतिक्रिया (Source - ETV Bharat Reporter)

निसटत्या मतांनी पराभव : मुंबईतील चांदिवली मतदारसंघातून कॉंग्रेसतर्फे आरिफ नसीम खान उमेदवार होते. तर त्यांच्याविरोधात असलेले शिवसेनेचे दिलीप लांडे यांनी या मतदारसंघातून विजय मिळवला. खान यांचा 20 हजार 625 मतांनी पराभव झाला. खान हे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत निसटत्या मतांनी पराभूत झाले होते. त्यामुळं त्यांना या निवडणुकीत आपला विजय होईल, असा विश्वास होता. मात्र 20 हजार 625 मतांनी त्यांचा पराभव झाला. त्यामुळं त्यांनी ईव्हीएम चेकिंग व व्हेरिफिकेशनसाठी तब्बल साडे नऊ लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा केली आहे.

"निकाल जाहीर झाल्यापासून सात दिवसांच्या आत ईव्हीएममध्ये समाविष्ट असलेल्या बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट यांची तपासणी करता येणं शक्य आहे. एकूण मशीनच्या पाच टक्के मशीनची तपासणी करता येते. त्यानुसार आम्ही सुमारे साडे नऊ लाख रुपये भरले आहेत. निवडणूक आयोगाचे अधिकारी व ईव्हीएम उत्पादक अभियंते येऊन त्याबाबत पुढील प्रक्रिया करतील," असं आरिफ नसीम खान यांनी स्पष्ट केलं.

94 हजार 400 रुपये जमा : अणुशक्ती नगर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे फहाद अहमद हे रिंगणात होते. त्यांच्या विरोधात असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सना मलिक यांनी 49 हजार 341 मतं मिळवून फहाद यांचा 3 हजार 378 मतांनी पराभव केला. फहाद हे सुरुवातीच्या अनेक फेऱ्यांमध्ये आघाडीवर होते. मात्र, अखेरच्या फेरीपर्यंत त्यांचा पराभव झाला. त्यामुळं त्यांनी देखील ईव्हीएम तपासणी व पडताळणीसाठी रक्कम जमा केली आहे. एका मशीनसाठी 40 हजार रुपये व जीएसटी प्रमाणे त्यांनी दोन मशीनसाठी 94 हजार 400 रुपये जमा केले आहेत.

हेही वाचा

  1. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून शिंदेंचे माघार घेण्याचे संकेत; युतीधर्म की राजकीय अपरिहार्यता?
  2. ...तर जितेंद्र आव्हाड आमदारकीचा राजीनामा देणार
  3. ...तर लाडक्या बहिणीला 2100 सोडाच 1500 रुपयेसुद्धा मिळणार नाहीत; नेमकं कारण काय?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.