नवी दिल्ली : लोकसभा (Lok Sabha) आणि राज्यसभेच्या (Rajya Sabha) हिवाळी अधिवेशनाचा (Parliament Winter Session 2024) पाचवा दिवस शुक्रवारी (29 नोव्हेंबर) गदारोळानं सुरू झाला. त्यानंतर सुरुवातीला काही काळापर्यंत तर नंतर दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब (Both houses adjourned for 5th day) करण्यात आलय.
सभागृहात गदारोळ : अदानी वाद आणि उत्तर प्रदेशातील संभल येथे नुकत्याच झालेल्या हिंसाचारावर विरोधकांनी केलेल्या जोरदार निदर्शनांमुळं लोकसभेचं कामकाज शुक्रवारी दुपारपर्यंत तहकूब करण्यात आलं. आज सभागृहाची बैठक सुरू होताच काँग्रेससह विरोधी पक्षांच्या सदस्यांनी विविध मुद्दे उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सभागृहात गदारोळ झाला अन् कामकाज पुन्हा दिवसभरासाठी थांबवण्यात आलं.
हिवाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस : 25 नोव्हेंबरपासून संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू झालं. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच विरोधी पक्षाच्या खासदारांनी लोकसभेत अदानींच्यावरील आरोपांवर वारंवार चर्चा करण्याचा प्रयत्न केला. शुक्रवारी राज्यसभेत विरोधी पक्षांच्या खासदारांच्या सततच्या घोषणाबाजीमुळं, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी सभागृह पुन्हा तहकूब करण्यात आलं. लोकसभेचं कामकाज दिवसभर तर राज्यसभेचं कामकाज 2 डिसेंबरपर्यंत तहकूब (Both houses adjourned) करण्यात आलं आहे.
लोकसभेत विविध विषयांवर विरोधी पक्षाच्या खासदारांनी मांडलेल्या स्थगन प्रस्तावाच्या नोटिसा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी फेटाळल्या, तर राज्यसभेचे सभापती जगदीप धनखर यांनी नियम 267 अन्वये विविध विरोधी पक्षांच्या सर्व 16 नोटिसा फेटाळल्या. दरम्यानच्या काळात, मुदत वाढवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. वक्फ (दुरुस्ती) विधेयकाचं परीक्षण करणाऱ्या JPC चा कालावधी अर्थसंकल्पीय अधिवेशन 2025 च्या शेवटच्या दिवसापर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव सभागृहानं मंजूर केला.
हेही वाचा -