रायपूर Soldier Dead in Accidental Firing : लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणांकडून मोठी काळजी घेण्यात येत आहे. दंतेवाड्यातील नक्षलग्रस्त नारायणपूर इथं डीआरजी पथक शोधमोहीम राबवताना अपघातानं गोळी सुटून एका जवानाचा मृत्यू झाला. या घटनेत आणखी एक जवान जखमी झाला आहे. अपघातानं गोळीबार घडल्यानंतर या जखमी जवानाला तत्काळ एयरलिफ्ट करण्यात आलं. त्याच्यावर रायपूरमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती सुरक्षा दलाकडून देण्यात आली आहे.
गस्त सुरु असताना अपघातानं गोळी सुटून मृत्यू :दंतेवाडा जिल्ह्यातील वरसूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरक्षा जवान गस्त घालत होते. यावेळी हंदवाडा आणि हितवाडा परिसरात सशस्त्र नक्षलवादी असल्याची माहिती सुरक्षा दलातील जवानांना मिळाली. त्यामुळे 24 एप्रिलला डीआरजी आणि बस्तर फायटर दंतेवाडा यांचं संयुक्त पथक दंतेवाडा आणि नारायणपूरच्या सीमावर्ती भागात नक्षलवाद्यांचा शोध घेत होतं. यावेळी मोहीमेत चुकून गोळी लागल्यानं दंतेवाडाचे दोन जवान जखमी झाले. त्यातील एका जवानाला वीरमरण आलं, तर दुसऱ्या जवानावर उपचार सुरू आहेत. या जवानांना तत्काळ एयरलिफ्ट करण्यात आल्याची माहिती सुरक्षा दलाकडून देण्यात आली.