महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

शशी थरुर यांना धक्का : सोनं तस्करी प्रकरणी पीएला दिल्ली विमानतळावरुन अटक - Shashi Tharoor Assistant Arrested - SHASHI THAROOR ASSISTANT ARRESTED

Shashi Tharoor Assistant Arrested : सोनं तस्करी प्रकरणात काँग्रेस नेते शशी थरुर यांच्या पीएला अटक करण्यात आली. त्यामुळे शशी थरुर यांना चांगलाच धक्का बसला आहे. या प्रकरणी शशी थरुर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Shashi Tharoor Assistant Arrested
संपादित छायाचित्र (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : May 30, 2024, 12:39 PM IST

Updated : May 30, 2024, 3:00 PM IST

नवी दिल्ली Shashi Tharoor Assistant Arrested :काँग्रेस नेते शशी थरुर यांना मोठा धक्का बसला आहे. सोनं तस्करी प्रकरणात त्यांचे पीए शिवकुमार दास याला सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. शिवकुमार दास याला दिल्ली विमानतळावरुन अटक करण्यात आली आहे. शिवकुमार हा एका व्यक्तीकडून परदेशातून आणलेलं सोनं ताब्यात घेत होता. त्यामुळे शिवकुमार दास याला सीमा शुल्क विभागानं सोन्याच्या तस्करीच्या आरोपाखाली अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

काँग्रेस नेते शशी थरुर यांचा पीए अटकेत :काँग्रेस नेते शशी थरुर यांचा पीए शिवकुमार दास याला सोनं तस्करी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. शिवकुमार दास हा दिल्ली विमानतळावर त्याच्या ओळखीच्या व्यक्तीकडून सोनं ताब्यात घेत होता. यावेळी त्याला सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडलं. शिवकुमार दास याला सोनं तस्करी प्रकरणात अटक करण्यात आल्यानंतर काँग्रेस नेते शशी थरुर यांना मोठा धक्का बसला आहे.

विदेशातून आणलेलं सोनं घेत होता ताब्यात :सीमाशुल्क विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली विमानतळावर सोन्याच्या तस्करी प्रकरणात सीमा शुल्क विभागानं 29 मे रोजी दोन जणांना ताब्यात घेतलं होतं. त्यापैकी एकाची ओळख शिवकुमार दास म्हणून करण्यात आली. तो काँग्रेस नेते शशी थरूर यांचा पीए असल्याचं सांगतो. त्याच्या ताब्यातून एकूण 500 ग्रॅम सोनं जप्त करण्यात आलं आहे. शिवकुमार हा त्याच्या एका ओळखीच्या व्यक्तीकडून परदेशातून आणलेलं सोनं हस्तगत करत होता. शिवकुमार दास याला सीमाशुल्क विभागानं सोन्याच्या तस्करीच्या आरोपाखाली बुधवारी अटक केली.

शशी थरुर यांना मोठा धक्का :शिवकुमार दास याला अटक करण्यात आल्यानंतर शशी थरुर यांना मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणात शशी थरुर यांनी एक्सवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. "माझ्या पूर्व सहकाऱ्याच्या बाबत घडलेली घटना ऐकून मला धक्का बसला आहे. हा कर्मचारी मला अंशकालिक सेवा प्रदान करत आहे. हा कर्मचारी 72 वर्षांचा असून त्याला सतत डायलिसिस करावं लागत आहे. अनुकंपा तत्वावर त्याला कामावर ठेवण्यात आलं. याप्रकरणी तपास अधिकाऱ्यांनी योग्य तो तपास करावा, मी तपास अधिकाऱ्यांचं समर्थन करतो. कायदा आपलं काम चोख करेल," असं शशी थरुर यांनी नमूद केलं आहे.

हेही वाचा :

  1. शशी थरुर यांनी गायलेले हिंदी गाणे व्हायरल, जावेद अख्तर यांचे मिश्किल ट्विट
  2. Shashi Tharoor With Women MPs : शशी थरुर यांनी मागितली माफी, संसदेला म्हणाले होते "आकर्षक ठिकाण"
  3. दिवंगत पत्नी सुनंदाला वादात ओढल्याने विवेक अग्निहोत्री, अनुपम खेरवर संतापले शशी थरुर
Last Updated : May 30, 2024, 3:00 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details