हैदराबाद RRB NTPC Recruitment: रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डने (RRB) भारतीय रेल्वेमध्ये नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज (NTPC) पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. रेल्वे मंडळाकडून येत्याबाबत काही दिवसांत इतर माहिती जाहीर केली जाणार आहे.
नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज पोस्ट :भारतीय रेल्वे बोर्डाने एकूण 11,558 पदांसाठी भरती जाहीर केली आहे. ही भरती NTPC म्हणजेच नॉन-टेक्निकल पोस्टसाठी आहे. या भरतीमध्ये पदवी आणि पदवीपूर्व उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. ज्या पदांसाठी पदवीधराची पात्रता आहे, त्याकरिता फॉर्म भरण्याची तारीख 14 सप्टेंबर 2024 ते 13 ऑक्टोबर 2024 आहे. तर पदवीपूर्व पात्रता असलेल्या पदांसाठी फॉर्म भरण्याची तारीख 21 सप्टेंबर 2024 ते 20 ऑक्टोबर 2024 आहे.
NTPC पदांसाठी काय पात्रता आहे?
- पदवीधर पदांसाठी अर्जदारांकडे पदवी असणे आवश्यक आहे.
- पदवीपूर्व पदांसाठी अर्जदारांचे 10+2 म्हणजेच उच्च माध्यमिक शिक्षण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा काय आहे:
- पदवीधर पात्रता असलेल्या पदांसासाठी वयोमर्यादा - 18 ते 33 वर्षे
- पदवीची पात्रता असलेल्या पदांसाठी वयोमर्यादा - 18 ते 33 वर्षे
- आरक्षित वर्गासाठी वयात सवलत आहे.
कोणत्या जागांवर होणार भरती
पदवीधर पदांसाठी
- चीफ कमर्शियल कम तिकीट पर्यवेक्षक- एकूण 1,736 पदे
- स्टेशन मास्टर- एकूण 994 पदे
- गुड्स ट्रेन मॅनेजर- एकूण 3,144 पदे
- कनिष्ठ खाते सहाय्यक सह टायपिस्ट- एकूण 1,507 पदे
- वरिष्ठ लिपिक कम टायपिस्ट- एकूण 732 पदे
पदवीपूर्व पदांसाठी
- कमर्शियल कम तिकीट क्लर्क- एकूण 2,022 पदे
- खाते लिपिक सह टंकलेखक- एकूण 361 पदे
- कनिष्ठ लिपिक कम टायपिस्ट- एकूण 990 पदे
- ट्रेन क्लार्क- एकूण 72 पदे