चंदीगड Ram Rahim Came Out Of Jail : डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम याला 20 दिवसांचा पॅरोल मिळाला आहे. त्यामुळे राम रहीम हा सुनारिया कारागृहातून बाहेर आला आहे. गुरमीत राम रहीमला तब्बल 20 दिवसांचा पॅरोल मिळाल्यानं त्याच्या भक्तांनी मोठा जल्लोष केला आहे. कारागृहातून बाहेर आल्यानंतर राम रहीम थेट बरनावा आश्रमात धडकला. इथ त्याचं त्याच्या भक्तांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केलं. आज सकाळी गुरमीत राम रहीमला कारागृहातून बाहेर काढण्यात आलं. राम रहीमला पॅरोल मिळाल्यानं कारागृह परिसराची सुरक्षा वाढवण्यात आली. कडेकोट पोलीस बंदोबस्तात राम रहीमला कारागृहातून बाहेर काढण्यात आलं.
राम रहीमला सशर्त 20 दिवसाचा पॅरोल : डेरा सच्चा सौदा प्रमुख राम रहीम याला तब्बल 20 दिवसाचा पॅरोल मंजूर करण्यात आला आहे. मात्र राम रहीम हा आगामी हरियाणा विधानसभा निवडणुकीत प्रभाव टाकू शकतो, असा आरोप काँग्रेसनं घेतला आहे. राम रहीमला सशर्त पॅरोल मंजूर करण्यात आला आहे. मात्र पॅरोल मिळाल्यानंतर राम रहीम हरियाणात राहणार नाही. राम रहीम हा सोशल मीडियावर सक्रिय राहणार नाही. राम रहीम यानं निवडणुकीच्या कोणत्याही कामांत सहभागी होऊ नये, आदी अटी घालून देण्यात आलेल्या आहेत. या अटींचं उल्लंघन केल्यास राम रहीम याचा पॅरोल त्वरित रद्द करण्यात येईल, अशी तंबीही त्याला देण्यात आली आहे.