राजकोट गेमिंग झोन आग दुर्घटना (Source (ETV भारत गुजरात डेस्क)) राजकोट Fire in Game Zone Gujarat : राजकोटमधील नाना मौवा रोडवरील टीआरपी गेम झोनमध्ये शनिवारी (25 मे) संध्याकाळी भीषण आग लागली. या दुर्घटनेत आतापर्यंत 30 जणांचा मृत्यू झालाय. राज्य सरकारनं मृतांच्या कुटुंबीयांना मदत जाहीर केली. राजकोट टीआरपी गेम झोन येथील आगीच्या घटनेची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेलही आज राजकोटला पोहोचले आहेत. त्यांनी सकाळी अपघातग्रस्त गेम झोनची पाहणी केली. त्यांनी अधिकाऱ्यांकडून मदत आणि बचाव कार्याची तपशीलवार माहिती घेतली.
काय म्हणाले गृह राज्यमंत्री हर्ष संघवी :या घटनेसंदर्भात गुजरातचे गृह राज्यमंत्री हर्ष संघवी म्हणाले की, "राजकोटमध्ये एक अतिशय दुःखद घटना घडली. यामध्ये अनेक कुटुंबांनी आपल्या प्रियजनांना गमावलं. यात अनेक मुलांचाही मृत्यू झालाय. क्रीडा क्षेत्राच्या बांधकामाची जबाबदारी असलेल्या सर्व विभागीय अधिकाऱ्यांना आज पहाटे तीन वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लवकरच कार्यवाही केली जाईल."
गेम झोनच्या मालकासह जबाबदार असलेल्यांना अटक : गृहमंत्र्यांनी टीआरपी गेमिंग झोन, दरबार चौक, नाना मौवा, पोलीस आयुक्त राजू भार्गव, महापालिका आयुक्त आनंद पटेल, उपमहापालिका आयुक्त स्वप्नील खरे, मुख्य अग्निशमन अधिकारी इलेश खेर यांच्याकडून घटनेची माहिती घेतली. यानंतर गृह राज्यमंत्री हर्ष संघवी यांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांशी संवाद साधला. हर्ष संघवी म्हणाले, " आगीचं स्वरूप अतिशय भीषण असून काही मिनिटांतच आग सर्वत्र पसरली होती. घटनेनंतर काही वेळातच अग्निशमन दलाच्या पथकानं आग विझवण्यास सुरुवात केली. यासोबतच बचावकार्यही सुरू करण्यात आलंय. या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या सर्वांवर कठोर कारवाई केली जाईल," असं आश्वासनही त्यांनी दिलं. हर्ष संघवी सध्या राजकोटमध्ये असून वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत ते बचावकार्यावर लक्ष ठेवून आहेत. या घटनेनंतर काही वेळातच पोलीस विभागानं गेम झोनच्या मालकासह 4 जणांना अटक केली. लवकरच यातील इतर जबाबदार लोकांवरही कारवाई केली जाईल.
अपघातानंतरच्या परिस्थितीवर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया : राज्याचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी या संदर्भात पंतप्रधान मोदींशी दूरध्वनीवरून चर्चा केली होती. राज्य सरकारनं आतापर्यंत केलेल्या सर्व प्रयत्नांची माहिती मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना सांगितली. तर पंतप्रधान मोदींनी दोषींवर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
हेही वाचा -
- गुजरातच्या राजकोट शहरात गेम झोनमध्ये 'अग्नितांडव'; 25 जणांचा होरपळून मृत्यू - Fire in Game Zone Gujarat
- डोंबिवली एमआयडीसी स्फोटातील मृतांचा आकडा 11 वर; कंपनी मालकाला नाशिकमधून अटक - Dombivli MIDC Blast
- बांगलादेशच्या राजधानीत सात मजली इमारतीत अग्नितांडव; 44 जणांचा होरपळून मृत्यू