महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

माजी पंतप्रधान राजीव गांधी हत्येप्रकरणातील आरोपी संथनचा मृत्यू : 'या' रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास - संथन

Rajiv Gandhi Assassination Case : भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झालेल्या सात जणांपैकी श्रीलंकन ​​संथन एक होता. नोव्हेंबर 2022 मध्ये सुप्रीम कोर्टानं त्याच्या सुटकेचे आदेश दिले होते. त्याला त्रिची मध्यवर्ती कारागृहातील विशेष शिबिरात ठेवण्यात आलं होतं.

Rajiv Gandhi Assassination Case
Rajiv Gandhi Assassination Case

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 28, 2024, 12:23 PM IST

चेन्नई Rajiv Gandhi Assassination Case : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी दोषी संथन याचा आज सकाळी मृत्यू झाला. चेन्नईच्या राजीव गांधी जनरल हॉस्पिटलमध्ये बुधवारी सकाळी संथन यानं अखेरचा श्वास घेतला. आज सकाळी 7.50 वाजता संथनचा मृत्यू झाल्याचं रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. त्याला यकृत निकामी होऊन क्रिप्टोजेनिक सिरोसिसचा त्रास होता. 27 जानेवारी रोजी त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

सहा आरोपांपैकी एक : संथन उर्फ ​​सुथेंथीराजा याला गंभीर अवस्थेत राजीव गांधी शासकीय सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं हेतं. 55 वर्षीय संथन याला तिरुची येथील महात्मा गांधी मेमोरियल सरकारी रुग्णालयातून रेफर करण्यात आलं. राजीव गांधी हत्येप्रकरणी त्याला यापूर्वी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्या सहा दोषींपैकी तो एक होता.

सर्वोच्च न्यायालयानं 2022 मध्ये त्याची सुटका केली होती : 11 नोव्हेंबर 2022 रोजी सर्वोच्च न्यायालयानं राजीव गांधी हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या 6 दोषींना सोडण्याचे आदेश दिले होते. आदेशानंतर दुसऱ्या दिवशी नलिनी, श्रीहरन, संथन, रॉबर्ट पायस, जयकुमार आणि रविचंद्रन यांची तब्बल 32 वर्षांनंतर तुरुंगातून सुटका झाली. त्यातील नलिनी आणि रविचंद्रन यांना त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्याची परवानगी देण्यात आली होती. परंतु उर्वरित चौघांना मात्र त्रिची मध्यवर्ती कारागृहात विशेष शिबिरात ठेवण्यात आले होते. हे चौघंही श्रीलंकेचे नागरिक असल्यानं असं करण्यात आलं होतं.

श्रीलंकेत जाण्याची परवानगी : संथननं त्रिची तुरुंगातील विशेष शिबिरातील त्याच्या सेलमधून एक खुलं पत्र लिहिलं होतं. या पत्रात त्यानं आपल्याला सूर्यप्रकाशही दिसत नसल्याचं म्हटलं होतं. या पत्राद्वारे त्यानं जगभरातील तमिळांना आवाज उठवण्याचं आवाहन केलं होतं, जेणेकरुन ते त्यांच्या देशात परत जातील. चेन्नईतील परदेशी प्रादेशिक नोंदणी कार्यालयानं (एफआरआरओ) गेल्या शुक्रवारी संथन उर्फ ​​सुथेनथिराजाला श्रीलंकेत परतण्याची परवानगी देणारा आदेश जारी केला होता, परंतु आजारपणामुळं तो जाऊ शकला नाही.

हेही वाचा :

  1. Rahul Gandhi Pay Tribute To Rajiv Gandhi : राहुल गांधींनी पँगॉग तलावाकाठी वडील राजीव गांधींना वाहिली आदरांजली
  2. Amethi Lok Sabha Constituency : अमेठी मतदारसंघ होता गांधी घराण्याचा बालेकिल्ला, जाणून घ्या इतिहास

ABOUT THE AUTHOR

...view details