रायबरेली/ उन्नाव Rae Bareli-Unnao Road Accident : उन्नावमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना सफीपूर कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जमालुद्दीनपूरजवळ घडली आहे. पोलिसांनी जखमींना उपचारासाठी सफीपूर सामुदायिक आरोग्य केंद्रात पाठवलंय आहे. मृतदेह रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात सफीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जमालुद्दीनपूर येथे झाला. अपघातग्रस्त बस बांगरमऊवरून उन्नावच्या दिशेनं जात होती. जमालुद्दीनपूर गावाजवळ येताच या बसला समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकनं जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, अपघातानंतर ट्रक बसची एक बाजू कापत गेला.
पती-पत्नीचा मृत्यू : तर दुसरीकडं रायबरेली येथे रविवारी (28 एप्रिल) एक रस्ता अपघात झाला. या अपघातात मोपेडवर बसलेल्या पती-पत्नीला कारनं धडक दिली. यामध्ये पतीचा जागीच मृत्यू झाला. तर जखमी पत्नीला रायबरेली जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं असता, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील बछरावन पोलीस स्टेशन हद्दीतील पश्चिम गावाजवळ दुपारी 1 वाजेच्या सुमारास भरधाव वेगात असलेल्या एका अनियंत्रित कारनं मोपेडवर बसलेल्या जोडप्याला धडक दिली. या अपघातात पतीचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. गंभीर जखमी महिलेला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला. रायबरेली येथे झालेल्या अपघातानंतर कार क्रमांक HR 87 N 3338 चा चालक कार सोडून घटनास्थळावरून पळून गेला. होरीलाल असं अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचं नाव असून तो रायबरेली जिल्ह्यातील बछरावन पोलीस स्टेशन परिसरातील गुलाल खेडा येथील रहिवासी आहे. तर कार चालकाचा शोध सुरू असल्याचं बछरावन पोलीस ठाण्याकडून सांगण्यात आलंय.
हेही वाचा -
- वऱ्हाडावर काळाचा घाला ; लग्नाहून परतणाऱ्या वाहनाला भरधाव ट्रकची धडक, 9 जण ठार - Accidnt in Jahlawar
- पुष्कर जोगचा स्कॅाटलॅंडमध्ये शूटिंग सुरू असताना अपघात, पाहा व्हिडिओ - Pushkar Jog
- झारसुगुडा बोट अपघात: ओडिशात बोट उलटून सात प्रवाशांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता - Jharsuguda Boat Mishap