महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

अमृतकाळात देशाला नव्या उंचीवर नेण्याची सुवर्णसंधी; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा राष्ट्राला उद्देशून विशेष संदेश - राष्ट्राला उद्देशून संदेश

President Droupadi Murmu राष्ट्रपदी द्रौपदी मुर्मू यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून संदेश दिला. यामध्ये त्यांनी भारताची लोकशाही ही लोकशाहीची जनक असल्याचं म्हटलंय. तसंच देशाला नव्या उंचीवर नेण्यासाठी अमृत कालामध्ये सर्वांनी कामाला लागूया असं आवाहन केलंय.

राष्ट्रपती द्रौपती मुर्मू
राष्ट्रपती द्रौपती मुर्मू

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 25, 2024, 7:54 PM IST

नवी दिल्लीPresident Droupadi Murmu- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशातील जनतेला महत्वाचा संदेश दिलाय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला दिलेल्या आपल्या भाषणात म्हणतात, "राष्ट्र अमृत कालच्या सुरुवातीच्या काळात आहे. हा परिवर्तनाचा काळ आहे. देशाला नव्या उंचीवर नेण्याची सुवर्णसंधी आपल्याला मिळाली आहे. प्रत्येकाकडून दिलं गेलेलं योगदान आपली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल."

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशाला संबोधित केलं. त्यावेळी त्यांनी जनतेला भारताला प्रगतीपथावर नेण्यासाठी योगदान देण्याची साद घातली. "उद्या तो दिवस आहे जेव्हा आपण संविधानाच्या प्रारंभाचा उत्सव साजरा करू. त्याची प्रस्तावना "आम्ही, भारताचे लोक" या शब्दांनी सुरू होते. या संविधानाच्या 'थीमवर प्रकाश टाकणे', म्हणजे लोकशाही आहे. भारतात लोकशाही व्यवस्था पाश्चात्य लोकशाहीच्या संकल्पनेपेक्षा खूप जुनी आहे. त्यामुळेच भारताला ‘लोकशाहीची जननी’ म्हटले जाते. अशा शब्दात भारतीय लोकशाहीचा मुर्मू यांनी गौरव केला.

मुर्मू आपल्या भाषणात म्हणाल्या, "आमचा जीडीपी वाढीचा दर अलिकडच्या वर्षांत जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये सर्वोच्च राहिला आहे आणि आमच्याकडे या प्रगतीवर विश्वास ठेवण्याची ती सर्व कारणे आहेत की ही कामगिरी 2024 आणि त्यानंतरही निरंतर चालू राहील." तसंच मुर्मू यांनी देशातील महिलांच्या सक्षमीकरणावरही भर देण्यासंदर्भात आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या की, "मला विश्वास आहे की नारी शक्ती वंदन अधिनियम हे महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक क्रांतिकारी साधन ठरेल."

अयोध्या राम मंदिराच्या संदर्भात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आपल्या भाषणात म्हणतात, "या आठवड्याच्या सुरुवातीला, आम्ही अयोध्येत बांधलेल्या भव्य नवीन मंदिरात भगवान श्री रामाच्या मूर्तीची ऐतिहासिक 'प्राण प्रतिष्ठा' पाहिली. जेव्हा या घटनेकडे व्यापक दृष्टीकोनातून पाहिले जाते, त्यावेळी असं म्हणावं लागेल की भविष्यातील इतिहासकार भारताच्या सभ्यतेच्या वारशाच्या सततच्या परिवर्तनातील ही एक महत्त्वाची खूण मानतील. मंदिराचे बांधकाम योग्य न्यायिक प्रक्रियेनंतर आणि देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सुरू झाले. आता हे मंदिर एक भव्य वास्तू म्हणून उभे आहे. हे मंदिर केवळ लोकांच्या विश्वासाचीच नव्हे तर न्यायालयीन प्रक्रियेवरील लोकांच्या प्रचंड विश्वासाचा दाखला देते.

हे वाचलंत का...

  1. मनोज जरांगे पाटलांना मुंबई पोलिसांनी बजावली नोटीस; 'मुंबईतील जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता'
  2. महाराष्ट्रीयन गोविंदगिरी महाराजांच्या हस्ते पंतप्रधान मोदींनी सोडला उपवास; वाचा कोण आहेत गोविंदगिरी महाराज?

ABOUT THE AUTHOR

...view details