ETV Bharat / state

लाच प्रकरणात खटावच्या तहसीलदार बाई मानेंसह चौघांना दिलासा, 'या' तारखेपर्यंत अटक न करण्याचा न्यायालयाचा आदेश - SATARA BRIBERY CASE

साताऱ्यातील जिल्हा सत्र न्यायाधीशांचं लाच प्रकरण गाजत असतानाच खटाव तहसीलदारही लाच प्रकरणात अडकल्यानं जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली आहे.

satara bribery case Vaduz court gives relief for four including Khatav Tehsildar Bai Mane till 27 January
सातारा लाच प्रकरण (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 12, 2025, 10:18 AM IST

सातारा : साताऱ्यातील खटावच्या तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यकानं डंपर मालकाकडून 55 हजारांची लाच घेतल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात तहसीलदार बाई माने यांच्यासह दोन तलाठी आणि लिपीक, अशा चौघांना दिलासा मिळालाय. वडूजच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयानं या चौघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. 27 जानेवारीपर्यंत त्यांना अटक करू नये, असा आदेश देत न्यायालयानं त्यांना अटकेपासून संरक्षण दिलंय.

तहसीलदारांसह चौघांची उच्च न्यायालयात धाव : डंपर मालकाकडून महसूल सहाय्यकानं 55 हजाराची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं खटावच्या तहसिलदार बाई माने यांच्यासह दोन तलाठी आणि एक लिपीक, अशा चौघांवर गुन्हा दाखल केला होता. त्यांनी वडूजच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. तो अर्ज फेटाळण्यात आला. मात्र, 27 जानेवारीपर्यंत त्यांना अटक न करण्याचा अंतरिम आदेश वडूजचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश हुद्दार यांनी दिला असल्याची माहिती बचाव पक्षाचे वकील ॲड. श्रीनिवास खराडे यांनी दिली.

नेमकी घटना काय? : खटाव तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक प्रवीण नांगरे याने डंपर मालकाकडून 55 हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी 21 नोव्हेंबर 2023 मध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अप्पर पोलीस अधिक्षक शितल जानवे-खराडे यांनी तपास करुन खटावच्या तहसीलदार बाई माने यांच्यासह औंधचे तलाठी धनंजय तडवळेकर, भोसरे गावचे तलाठी गणेश राजमाने आणि लिपीक रविंद्र कांबळे यांची नावं पुरवणी आरोपपत्रात दाखल केली होती.

अटकेपासून तात्पुरता दिलासा : तहसीलदारांसह चौघांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर वडूज येथील न्यायालयात दीर्घकाळ सुनावणी सुरू होती. अखेर न्यायालयानं चौघांचेही जामीन अर्ज फेटाळले. मात्र, ते उच्च न्यायालयात दाद मागणार असल्यानं त्यांना तूर्तास अटक करू नये, असा आदेश न्यायाधीश हुद्दार यांनी दिला.

हेही वाचा -

  1. चारशे रुपयांच्या लाचप्रकरणी डॉक्टरला 15 वर्षांनंतर शिक्षा; वाचा संपूर्ण प्रकरण
  2. न्यायाधीश लाच प्रकरणातील सरेंडर झालेल्या दोघांना पाच दिवसांची पोलीस कोठडी, ताबा ॲन्टीकरप्शनकडे
  3. पाच लाखांच्या लाच प्रकरणातील दोन संशयित न्यायालयात सरेंडर, मुख्य आरोपी अद्यापही फरार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.