अहमदाबाद PM Narendra Modi :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील 'इंडियाज टेक: चिप्स फॉर डेव्हलप्ड इंडिया'मध्ये सहभाग घेतला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1.25 लाख कोटी रुपयांच्या तीन सेमी कंडक्टर प्रकल्पांची पायाभरणी केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "या प्रकल्पांमुळे सेमी कंडक्टर उद्योगात हजारो तरुणांना रोजगार मिळेल. त्यासह इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार क्षेत्रात रोजगार निर्मितीला चालना मिळेल," असं स्पष्ट केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमात सहभाग घेतला.
जागतिक सेमीकंडक्टर उद्योगाचे नेतृत्व करण्यास सक्षम :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला जागतिक सेमी कंडक्टर उद्योगाचं नेतृत्व करण्यासाठी एंड टू एंड सेमी कंडक्टर इकोसिस्टम तयार करण्यात येत आहे. त्यासाठी केंद्र सरकारनं सेमी कंडक्टर मिशनची स्थापना केली आहे. त्यामुळे या प्रकल्पांमुळे तरुणांना रोजगारांची संधी निर्माण होतील, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळ स्पष्ट केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमधील धोलेरा इथं भारतातील पहिली फॅब सुविधा तर गुजरातमधील साणंद आणि आसाममधील मोरीगाव इथं आउटसोर्स सेमी कंडक्टर असेंब्ली आणि चाचणी (OSAT) अशा दोन प्रकल्पांची पायाभरणी त्यांनी यावेळी केली.