नवी दिल्ली:दिल्ली विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या प्रचंड यशानंतर भाजपा आता बिहार विधानसभा निवडणुकीकडे लक्ष केंद्रित करत आहे. बिहारच्या दौऱ्यात पंतप्रधान मोदी भागलपूर विमानतळ मैदानावरून किसान सन्मान निधीचा (PM Kisan yojana) १९ वा हप्ता जारी करणार आहेत.
पंतप्रधान मोदी विमानतळ मैदानावर जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमाला बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे उपस्थित असणार आहेत. सभेला सुमारे ५ लाख शेतकरी उपस्थित राहणार असल्याचा अंदाज आहे. या जाहीर सभेत पंतप्रधान मोदी किसान सन्मान योजनेचा योजनेचा १९ वा हप्ता हा जारी करणार आहेत. त्यामुळे देशातील सुमारे १० कोटी शेतकऱ्यांना एकूण २१,५०० कोटी रुपये वितरित केले जाणार आहेत.
भाजपा प्रवक्त्याची प्रतिक्रिया (Source- ETV Bharat) - काय आहे पंतप्रधान किसान निधी सन्मान योजना?या योजनेतील लाभार्थ्यांना केंद्र सरकार दर चार महिन्यांनी २००० रुपये, म्हणजेच दरवर्षी ६,००० रुपये देते. ही रक्कम वर्षातून तीनदा (एप्रिल-जुलै, ऑगस्ट-नोव्हेंबर आणि डिसेंबर-मार्च) शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाते.
योजनेत सामील होण्याकरिता ही आहे पात्रता
- भारतीय नागरिक असणं आवश्यक आहे.
- शेतीयोग्य जमीन असणं आवश्यक आहे.
- अल्पभूधारक शेतकरी असावा.
- शेतकरी प्राप्तिकर भरणारा नसावा.
- जमिनीची स्वत:कडं मालकी असावी.
- केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे.
पंतप्रधान दौऱ्याबाबत सत्ताधारी आणि विरोधकांची काय आहे प्रतिक्रिया-पंतप्रधान मोदींच्या बिहार दौऱ्याबद्दल भाजपा नेते शाहनवाज हुसेन म्हणाले, एनडीएचे वरिष्ठ नेते आणि भागलपूर, मुंगेर, बेगुसरायसह १३ जिल्ह्यांतील लोक रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत. दिल्लीप्रमाणेच २०२५ च्या बिहार निवडणुकीतही विजय मिळेल असा त्यांनी विश्वास व्यक्त केला. बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये (एनडीए) भाजपा, जनता दल (संयुक्त), लोक जनशक्ती पार्टी (रामविलास), हिंदुस्तान अवाम मोर्चा आणि राष्ट्रीय लोक मोर्चा हे घटक पक्ष आहेत. राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते तेजस्वी यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बिहार दौऱ्यावर टीका केली. ११ वर्षे सत्तेत असूनही पाटणा विद्यापीठाला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला नाही. बिहारच्या विकासासाठी केंद्र सरकारच्या वचनबद्धतेवर तेजस्वी यादव यांनी शंका व्यक्त केली.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं अर्थसंकल्पातही बिहारचीही काळजी घेतली आहे. भागलपूरच्या भूमीवरून पंतप्रधान देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित होणार आहे. पंतप्रधान मोदी बिहारसाठी काही घोषणादेखील करू शकतात, असे बिहार भाजपाचे प्रवक्ते सिद्धार्थ शंभू यांनी म्हटलं.