महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

राज्यसभेच्या सभापतींवर संतापल्या जया बच्चन, म्हणाल्या, "तुमचा टोन मान्य नाही..." - JAYA BACHCHAN ON JAGDEEP DHANKAR - JAYA BACHCHAN ON JAGDEEP DHANKAR

Jaya Bachchan On agdeep Dhankar : राज्यसभेत आज सभापती जगदीप धनखड आणि समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांच्यात वाद झाला. शुक्रवारी सभागृहात कामकाजावेळी जया बच्चन पुन्हा एकदा भडकल्या. जया बच्चन यांनी धनखड यांच्या बोलण्याच्या टोनवर प्रश्न उपस्थित केला.

Jaya Bachchan On agdeep Dhankar
जया बच्चन, जगदीप धनखड (Source - ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 9, 2024, 6:06 PM IST

नवी दिल्ली Jaya Bachchan On agdeep Dhankar : शुक्रवारी राज्यसभेच्या सदस्या जया बच्चन आणि राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांच्यात राज्यसभेत जोरदार वादावादी झाली. जगदीप धनखड यांची बोलण्याची पद्धत चुकीची वाटल्यानं जया बच्चन यांनी राज्यसभेत नाराजी व्यक्त केली. त्या म्हणाल्या कि, "मी एक कलाकार आहे. बॉडी लँग्वेज चांगली समजते. मला माफ करा, पण तुमचा टोन मला अजिबात मान्य नाही."

जगदीप धनखड यांनी माफी मागावी :जया बच्चन म्हणाल्या की, "मी सभापतींच्या टोनवर आक्षेप घेतला. आम्ही सगळे काय शाळकरी मुलं नाहीत. आमच्यापैकी काही ज्येष्ठ नागरिक आहेत. विरोधी पक्षनेते बोलण्यासाठी उभे राहिले, तेव्हा त्यांनी माईक बंद केला. तुम्ही हे कसं करू शकता? हे चुकीचं आहे. त्यांना बोलू दिलं नाही तर आम्ही इथे काय करायला आलो आहोत? ही माझी पाचवी टर्म आहे. ते नेहमी असंसदीय शब्द वापरतात. ते म्हणाले की, तुम्ही सेलिब्रिटी आहात याची मला पर्वा नाही. हा महिलांचा अपमान आहे. त्यामुळे सभापती जगदीप धनखड यांनी माफी मागावी." "मी जया अमिताभ बच्चन, मी एक कलाकार आहे. मला बॉडी लँग्वेज आणि एक्सप्रेशन समजतं. मला माफ करा, पण तुमच्या बोलण्याचा टोन मला मान्य नाही. तुम्ही खुर्चीवर असलात तरी आम्हीसुद्धा सहकारी आहोत." असं म्हणत जया बच्चन यांनी संताप व्यक्त केला.

जगदीप धनखड काय म्हणाले ? :जया बच्चन यांच्या वक्तव्यावर जगदीप धनखड यांनीही प्रत्युत्तर दिलं तेम्हणाले, "तुम्ही अभिनय क्षेत्रात खूप नाव कमावलं. आम्ही तुमचा आदर करतो. तुम्हाला माहिती असेल की अभिनेत्याला कुठली गोष्ट कशी सांगायची हे दिग्दर्शक ठरवत असतो. ज्या गोष्टी मी या खुर्चीत बसून बघू शकतो, त्या तुम्ही तिथं बसून बघू शकत नाही. मला दररोज हा वाद नको आहे. आता पुरे झालं. तुम्ही सेलिब्रिटी असलात, तरी मी अशा गोष्टी अजिबात खपवून घेणार नाही. मी कोणाच्या सांगण्यावरून काम करत नाही."

  • विरोधकांचा सभात्याग :यानंतर सभागृहात दोन्ही बाजूकडून जोरदार गदारोळ झाला. दरम्यान बोलू न दिल्यानं संतप्त झालेल्या विरोधकांनी सभागृहावर बहिष्कार टाकत राज्यसभेतून सभात्याग केला. सभागृहात विरोधी पक्षातील अनेक सदस्य विरोधकांना बोलण्याची संधी देण्याची मागणी करत होते.

हेही वाचा

  1. ब्रिटीश उच्चायुक्त लिन्डी कॅमेरॉन यांनी घेतली योगी आदित्यनाथांची भेट; उत्तरप्रदेशात करणार गुंतवणूक - Lindy Cameron meets Yogi Adityanath
  2. दिल्ली दारू घोटाळा ; तब्बल 17 महिन्यानंतर कारागृहाबाहेर येणार मनीष सिसोदिया, सर्वोच्च न्यायालयानं मंजूर केला जामीन - SC Grants Bail To Manish Sisodia
  3. वक्फ दुरुस्ती विधेयक मुस्लिमविरोधी : खासदार असदुद्दीन ओवेसी यांची केंद्र सरकारवर टीका - Waqf Amendment Bill

ABOUT THE AUTHOR

...view details