ETV Bharat / bharat

बेकायदेशीरपणे अमेरिकेत राहणारे हद्दपार केलेले काही भारतीय आज अमृतसरमध्ये पोहोचणार - INDIANS DEPORTED FROM US

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात बेकायदेशीर स्थलांतरितांवर केलेल्या मोठ्या कारवाईचा भाग म्हणून भारतात अशा प्रकारे पहिल्यांदाच अमेरिकेतून हद्दपार नागरिक येत आहेत.

स्थलांतरितांच्या हद्दपारीसाठी सज्ज विमान
स्थलांतरितांच्या हद्दपारीसाठी सज्ज विमान (File)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 5, 2025, 3:50 PM IST

जालंधर : अमेरिकेतून हद्दपार करण्यात आलेल्या २०० हून अधिक भारतीय नागरिकांना घेऊन येणारे एक अमेरिकन लष्करी वाहतूक विमान आज अमृतसरमध्ये उतरणार आहे. टेक्सासमधील सॅन अँटोनियो येथून उड्डाण केलेल्या सी-१७ ग्लोबमास्टर विमानात अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहात असलेल्या २०५ भारतीय नागरिकांना इकडे आणण्यात येत आहे.

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात बेकायदेशीर स्थलांतरितांवर केलेल्या मोठ्या कारवाईचा भाग म्हणून भारतात अशा प्रकारची ही पहिलीच हद्दपारी आहे. २०५ हद्दपार झालेल्यांपैकी बरेच जण पंजाबचे आहेत आणि त्यांनी लाखो रुपये खर्च करून बेकायदेशीर मार्गांनी अमेरिकेत प्रवेश केला होता.

भारतीयांना घेऊन जाणाऱ्या हद्दपारीच्या विमानावर थेट भाष्य न करता, नवी दिल्लीतील अमेरिकन दूतावासातील प्रवक्त्याने मंगळवारी सांगितले की, वॉशिंग्टन इमिग्रेशन कायदे कडक करत आहे आणि बेकायदेशीर स्थलांतरितांना हटवत आहे. भारत आणि अमेरिका १२ ते १३ फेब्रुवारी दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वॉशिंग्टन भेटीच्या विविध घटकांना अंतिम रूप देत असताना अमेरिकेतून ही कारवाई करण्यात आली आहे.

अमेरिकेच्या कारवाईबद्दल भारताकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान, उत्तर अमेरिकन पंजाबी असोसिएशन (NAPA) ने बुधवारी पंजाब सरकारला अमेरिकेतून हद्दपार होणाऱ्यांना मदत करण्यासाठी पुनर्वसन निधी स्थापन करण्याची विनंती केली. एका निवेदनात, NAPA चे कार्यकारी संचालक सतनाम सिंग चहल म्हणाले की, या परत आलेल्यांना मदत आणि संसाधनांचा अभाव राज्यासाठी गंभीर सामाजिक आणि आर्थिक आव्हानांना कारणीभूत ठरू शकतो.

त्यांनी पंजाब सरकारला इशारा दिला की या वाढत्या संकटाला तोंड देण्याकडे दुर्लक्ष केल्याने राज्यासाठी आणखी समस्या निर्माण होतील. ज्यामुळे बेरोजगारी, मानसिक आरोग्य समस्या आणि बेकायदेशीर कारवायांमध्ये वाढ होईल. "यापैकी बरेच तरुण चांगल्या भविष्याची स्वप्ने घेऊन आपले घर सोडतात. परंतु स्थलांतराच्या आव्हानांमुळे त्यांना हद्दपार केले जाते. ते निराश झालेल्या आशा, आर्थिक त्रास आणि मानसिक आघात घेऊन परततात. त्यांचे योग्य पुनर्वसन करणे ही सरकारची जबाबदारी आहे," असं चहल म्हणाले.

त्यांचे जीवन पुन्हा उभारण्यास मदत करण्यासाठी कौशल्य विकास कार्यक्रम, रोजगाराच्या संधी आणि मानसिक आरोग्य समुपदेशनासाठी निधी वाटप करण्याचे आवाहन त्यांनी राज्य सरकारला केले. या समस्येचे प्रभावीपणे निराकरण करण्यासाठी व्यापक धोरणे तयार करण्यासाठी त्यांनी धोरणकर्त्यांना NAPA सारख्या संस्थांशी संवाद साधण्याचे आवाहन केले.

"ही केवळ वैयक्तिक समस्या नाही तर सामाजिक समस्या आहे," असंही चहल म्हणाले. "जर आपण आताच कारवाई करण्यात अयशस्वी झालो तर त्याचे परिणाम केवळ तरुणांसाठीच नव्हे तर पंजाबच्या सामाजिक रचनेसाठी आणि संपूर्ण अर्थव्यवस्थेसाठी भयानक होतील," अशी पुस्ती त्यानी जोडली.

हेही वाचा..

  1. ट्रम्प यांचे अमेरिकेतील स्थलांतरितांसाठी नवीन धोरण आणि त्याचे भारतावरील परिणाम

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.