पालघर Palghar Railway Accident :वसई रोड स्थानकावरील रेल्वे रुळावर सिग्नल दुरुस्तीचं काम करणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांचा लोकल ट्रेनच्या धडकेत मृत्यू झाला आहे. सोमवारी सायंकाळी 8.55 ला चर्चगेटवरून आलेल्या लोकलनं ही धडक दिली. रेल्वे अपघातात कर्मचाऱ्यांचा एकाचवेळी मृत्यू झाल्यानं वसई विभागातील सर्व रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या रेल्वे अपघातात भाईंदर विभागाचे अभियंता बासू मित्रा, सोमनाथ उत्तम आणि सहाय्यक सचिन वानखेडे यांचा मृत्यू झालाय.
५५ हजारांची मदत जाहीर : वसईत रेल्वे रूळ दुरुस्तीचं काम करणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांना एका लोकलने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. वसई रोड लोहमार्ग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रेल्वेने अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. रेल्वेने त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५५ हजारांची मदत देण्याचं जाहीर केलं आहे.
तीन कर्मचारी जागीच ठार : वसई रोड ते नायगाव दरम्यान -५० / १ A -४९ /१८ वर वासू मित्रा, मुख्य सिग्नलिंग निरीक्षक/भाईंदर, सोमनाथ उत्तम लांबुत्रे, इलेक्ट्रिकल सिग्नलिंग मेंटेनर, वसई रोड आणि सचिन वानखडे मदतनीस हे रूळ दुरुस्तीचं काम करीत असताना, लोकल गाडी नंबर ९०९१० ची धडक लागली. या अपघातात तीन कर्मचारी जागीच ठार झाले. दरम्यान घटनेची माहिती मिळताच विभागीय रेल्वे व्यवस्थापक आणि इतर वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत केली.
कुटुंबियांना सानुग्रह अनुदान :कुटुंबातील सदस्यांना तत्काळ प्रत्येकी ५५ हजारांचीमदत देण्याचं जाहीर करण्यात आलं आहे. शिवाय, १५ दिवसांच्या आत मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना सानुग्रह अनुदान आणि इतर देयके वितरीत केली जाणार आहेत. सचिन वानखेडे आणि सोमनाथ यांच्या कुटुंबाला अंदाजे ४० लाख रक्कम मिळेल. तर वासू मित्राच्या कुटुंबाला १.२४ कोटी या रकमेव्यतिरिक्त, मृत कर्मचार्यांच्या कुटुंबीयांना सेटलमेंट देय (DCRG, GIS, रजा रोखीकरण) दिले जातील. तडजोडीच्या थकबाकीची प्रक्रिया सुरू केली असून या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत .
हेही वाचा -
- Railway News: रेल्वे रूळ तुटला; तरुणाच्या सतर्कतेने मोठा अपघात टळला
- Railway Accident : बिगर इंजिनाची पळाली रेल्वे.. रुळावरून घसरले डब्बे.. मोठा अपघात टळला..
- Railway Accident : वांद्रे टर्मिनस जोधपूर सूर्यनगरी एक्स्प्रेसचे 8 डबे रेल्वे रुळावरून घसरले