ETV Bharat / bharat

कॉर्बेट टायगर रिझर्व्हमध्ये बसवलेल्या कॅमेऱ्यांमुळं महिलांच्या गोपनीयतेचं उल्लंघन? कोणी केला दावा?

कॉर्बेट टायगर रिझर्व्हमध्ये वन्यजीवांवर नजर ठेवण्यासाठी बसवलेले कॅमेरा ट्रॅप आणि ड्रोन महिलांच्या गोपनीयतेचं उल्लंघन करत असल्याचा दावा केंब्रिज अभ्यासात करण्यात आलाय.

Indian Wildlife Monitoring Tech Used To Intimidate, Spy On Women, Says Cambridge Study
केंब्रिजचे संशोधक त्रिशांत सिमलाई कॉर्बेट टायगर रिझर्व्ह, उत्तराखंडमधील एका महिलेशी संवाद साधताना (University of Cambridge)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 28, 2024, 7:48 AM IST

हैदराबाद : महिलांना जंगलात स्वतंत्र वाटतं, असं केंब्रिजच्या स्कॉलर त्रिशांत सिमलाई यांनी मुलाखत घेतलेल्या गावातील एका महिलेनं सांगितलं. त्रिशांत यांनी जेंडर्ड फॉरेस्ट समजून घेणे आणि संवर्धनासाठी डिजिटल पाळत ठेवणे, तंत्रज्ञानाचा वापर आणि महिलांनी विकसित केलेले लिंग-पर्यावरण संबंध, या विषयावर संशोधन केलंय. त्रिशांतच्या मते त्यांनी भारतातील कॉर्बेट व्याघ्र प्रकल्प (CTR) च्या जंगलांचे स्वरूप आणि त्यांच्या विविध सामाजिक-सांस्कृतिक संरचनांचे प्रात्यक्षिक केलंय. तसंच विविध सांस्कृतिक आणि उपजीविकेच्या गरजांसाठी महिला CTR च्या वनक्षेत्राचा वापर कसा करतात, यावरही त्यांनी प्रकाश टाकलाय.

निरीक्षणासाठी तंत्रज्ञानाचा वापर : वन्यजीव आणि नैसर्गिक अधिवासांवर लक्ष ठेवण्यासाठी, संरक्षित नैसर्गिक क्षेत्रांवर लक्ष ठेवण्यासाठी संरक्षण विज्ञानात रिमोट कॅमेरा ट्रॅप्स, साऊंड रेकॉर्डर आणि ड्रोनचा वापर वाढत आहे. उत्तराखंडमधील सीटीआरचा अभ्यास करणाऱ्या संशोधकाला असं आढळून आलं की, या तंत्रज्ञानाचा स्थानिक सरकार आणि पुरुष ग्रामस्थ महिलांच्या परवानगीशिवाय त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक करत आहेत. महिलांना धमकावण्यासाठी आणि हेरगिरी करण्यासाठी वन्यजीवांवर पाळत ठेवण्याचं तंत्र वापरलं जात असल्याचंही त्यांच्या निदर्शनास आलं.

Indian Wildlife Monitoring Tech Used To Intimidate, Spy On Women, Says Cambridge Study
कॉर्बेट व्याघ्र प्रकल्पातून बदली झाल्यानंतर राजाजी व्याघ्र प्रकल्पाच्या मोतीपूर रेंजमध्ये वाघिणीला सोडण्यात आले. (ANI)

अभ्यासात काय म्हटलंय? :

'जेंडर-बेस्ड फॉरेस्ट : डिजीटल सर्व्हिलन्स टेक्नॉलॉजी फॉर कॉन्झर्वेशन अँड एनव्हायर्नमेंट रिलेशनशिप' या शीर्षकाचा हा अभ्यास पर्यावरण आणि नियोजन मासिकात प्रकाशित झालाय. अभ्यासाचे लेखक, केंब्रिजचे संशोधक त्रिशांत सिमलाई यांनी 14 महिन्यांत उत्तर भारतातील राष्ट्रीय उद्यानाच्या आसपास राहणाऱ्या 270 स्थानिक लोकांची मुलाखत घेतली. मुलाखत घेणाऱ्यांमध्ये प्रामुख्यानं जवळपासच्या गावातील महिला होत्या. अहवालात हे उघड झालं की, राष्ट्रीय उद्यानातील वन रेंजर्स स्थानिक महिलांना जंगलातून हाकलण्यासाठी आणि नैसर्गिक संसाधनं गोळा करण्यापासून रोखण्यासाठी जाणूनबुजून ड्रोनचा उपयोग करतात.

महिलांची दुर्बलता : सिमलाई यांनी सांगितलं की, काही महिलांनी पुरुषप्रधान गावापासून दूर जंगलात आश्रय घेतला होता. त्यांच्यावर कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवली जात आहे. त्यामुळं त्यांना व्यत्यय आल्यासारखं वाटतंय. संशोधकानं एका महिलेची मुलाखत घेतली. ती नंतर वाघाच्या हल्ल्यात ठार झाली. जाणीवपूर्वक मानवी निरीक्षण आणि धमकावण्याची परिस्थिती दिसून येते. तसंच संशोधकानं असंही म्हटलंय की, इतर अनेक ठिकाणी-अगदी यूकेच्या राष्ट्रीय उद्यानांमध्येही नकळत वन्यजीव निरीक्षण उपकरणांद्वारे लोकांची माहिती कॅप्चर केली जात आहे.

केंब्रिज युनिव्हर्सिटीच्या कन्झर्व्हेशन लीडरशिप प्रोग्रामचे संचालक प्रोफेसर ख्रिस सँडब्रुक म्हणाले की, "या निष्कर्षांमुळं संवर्धन समुदायात खळबळ उडालीय. वन्यजीवांचे निरीक्षण करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करणे प्रकल्पांसाठी सामान्य आहे. परंतु, ते तंत्र अनवधानानं कोणाला हानी पोहोचवू नयेत याची खात्री करणं आवश्यक आहे."

'धमक्या आणि अपमान': जळालेले लाकूड आणि औषधी वनस्पती गोळा करण्यापासून ते पारंपारिक गाण्यांद्वारे जीवनातील अडचणी सामायिक केल्या जातात. भारतातील कॉर्बेट व्याघ्र प्रकल्पाजवळ राहणाऱ्या स्त्रिया अनेक गोष्टींसाठी जंगलाचा दररोज वापर करतात. कौटुंबिक हिंसाचार आणि मद्यपान या ग्रामीण भागातील व्यापक समस्या आहेत. अनेक महिला कठीण घरगुती परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी जंगलात बराच वेळ घालवतात. एका स्थानिक महिलेनं सांगितलं की, "महिलांना जंगलात मोकळं वाटतं. त्यांना सासरच्या लोकांचे तिरकस डोळे आणि नवऱ्याचे टोमणे आणि हिंसा सहन करावी लागत नाही." तर मुलाखत घेतलेल्या आणखी एका महिलेनं सांगितलं की, "जेव्हा जंगलात कॅमेरे असतात, तेव्हा मला वाटतं की मी काहीतरी चुकीचं करतेय. असं वाटतं की, मी जंगलातून काहीतरी चोरत आहे." सिमलाई यांनी सांगितलं की, "वन्यजीव निरीक्षण प्रकल्पांच्या नावाखाली वापरल्या जाणाऱ्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर महिलांना धमकावण्यासाठी आणि नियंत्रित करण्यासाठी केला जातोय."

महिलांचा छळ : पुढं सिमलाई म्हणाले, “जंगलात शौचाला जात असलेल्या एका महिलेचे छायाचित्र वन्यजीव निगराणीसाठी लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये कथितपणे कैद झाले होते. त्यानंतर हे छायाचित्र जाणूनबुजून स्थानिक फेसबुक आणि व्हॉट्सॲप ग्रुप्सवर छळाचा एक प्रकार म्हणून प्रसारित केले गेले. या घटनेनंतर गावकऱ्यांनी प्रत्येक कॅमेरा ट्रॅप तोडून पेटवून दिला."

मुलाखतीदरम्यान एका वनरक्षकानं सांगितलं की, "या गावातील महिला जंगलात मुख्यतः सरपण किंवा गवतासाठी जात नाहीत तर चुकीच्या कामासाठी जातात." तर एका स्थानिक सामाजिक अधिकार कार्यकर्त्यानं सांगितलं की, "आम्ही गरीब असल्यामुळं सीटीआरचे वन प्रशासन आमच्या गावाबरोबर बऱ्याच काळापासून संघर्ष करत आहे. जर या महिला उपेक्षित जात समूहातील नसत्या तर त्यांच्यासोबत असं कधीही झालं नसतं."

'शांतता' धोकादायक का आहे? : सिमलाई म्हणाले, "अभ्यासादरम्यान मला आढळलं की, स्थानिक महिला जंगलात एकत्र काम करताना मजबूत बंध निर्माण करतात. तसंच हत्ती आणि वाघांच्या हल्ल्यापासून स्वत:ला वाचवण्यासाठी त्या लाकूड गोळा करताना गातात. जेव्हा त्यांना कॅमेरा ट्रॅप्स दिसतात, तेव्हा त्या घाबरतात. आपल्याचा कोणी बघत आहे किंवा ऐकत आहे, याची त्यांना भीती वाटते. परिणामी त्या शांत बसतात. मात्र, यामुळं त्यांच्या जीवाला धोका असतो."

एका स्थानिक रहिवासी महिलेनं सांगितलं की, "आम्ही जंगलात प्रवेश करण्यापूर्वी आणि लाकूड गोळा करताना मोठ्यानं गाणे गातो. जेणेकरून प्राण्यांना कळेल की आम्ही येथे आहोत." तर एका वनरक्षकानं दावा केलाय की, "या महिला त्यांच्या गाण्यांद्वारे आमची नियमित छेड काढतात. दुसऱ्या दिवशी गस्त घालत असताना आम्हाला या महिला भेटल्या ज्या आधी न्योली (भक्तीगीत) गात होत्या, त्यांनी मला पाहताच वनरक्षकांवर उपहासात्मक गाणे म्हणायला सुरुवात केली." दरम्यान, उत्तर भारतासारख्या ठिकाणी, स्थानिक महिलांची ओळख त्यांच्या दैनंदिन व्यवहाराशी आणि जंगलातील सामाजिक भूमिकांशी घट्ट जोडलेली असते. या अभ्यासात असं म्हटलंय की, प्रभावी वन व्यवस्थापन धोरणांसाठी स्थानिक महिला जंगलांचा वापर कशा प्रकारे करतात, हे समजून घेणं महत्त्वाचं आहे.

हेही वाचा -

  1. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात नव्या पट्टेरी नर वाघाचं आगमन, दोन वर्षापासून 'या' अभयारण्यात होता वावर
  2. सह्याद्री-कोकण भ्रमणमार्गात 'इतक्या' वाघांचं अस्तित्व - Sahyadri Wildlife Research
  3. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस 2024; मानव-वन्यजीव संघर्षावर 'एआय' तंत्रज्ञानाची फुंकर; सहा गावांत यशस्वी प्रयोग - International Tiger Day 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.