Interim Budget 2024 : यावेळी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यावेळी महिला वर्ग आणि तरुणांसाठी महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत.
निर्मला सीतारमण यांनी काय सांगितल्या तरतूदी ?
- सरकार नेक्स्ट जेनरेशन रिफॉर्म आणणार
- गरजा पूर्ण करण्यासाठी आर्थिक क्षेत्र सज्ज
- पुढच्या 5 वर्षांत गरीबांसाठी 2 कोटी घरं बांधणार
- MSME साठी व्यावसाय सोपा करण्यासाठी काम सुरू
- रूफटॉप सोलर प्लान अंतर्गत 1 कोटी घरांना 300 यूनिट/महिना फ्री वीज
- देशात जास्तीत जास्त वैद्यकीय महाविद्यालयं सुरू करणार
- सर्वाइकल कॅन्सरसाठी लसीकरण वाढविलं जाईल, नॅनो डीएपीचा वापर सर्व क्षेत्रांमध्ये वाढविला जाईल
- डेअरी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी लवकरच योजना आणणार
बजेटमध्ये महिलांसाठी काय?-
- महिलांना संसदेत आरक्षण देण्यासाठी कायदा आणणार
- पीएम आवास योजनेतील 70 टक्के घरं महिलांना
- 1 कोटी महिला लखपती दीदी बनल्या आहेत. त्या अन्य महिलांसाठी प्रेरणा ठरल्या आहेत.
- लखपती दीदीचे लक्ष्य 2 कोटींवरून वाढवून 3 कोटी करण्यात आले आहे.
बजेटमध्ये आणखी काय?
- तीन हजार नवे आयटीआय खुले केले
- 15 नवी एम्स रुग्णालये तयार करणार
- पाच एकात्मिक ॲक्वा पार्क स्थापन करणार
- पुढील दोन वर्षांत दोन कोटी घरे बांधणार
- सौर ऊर्जा योजनेद्वारे 1 कोटी घरांना दरमहा 300 युनिट मोफत वीज देणार
'या' योजनेंतर्गत आणखी दोन कोटी घरं बांधली जाणार : अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की, जनधन खात्यांमध्ये पैसे जमा करून 2.7 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. सरकारचे आर्थिक व्यवस्थापन इतकं उच्च पातळीचं आहे की, त्यामुळं देशाला नवी दिशा आणि नवी आशा मिळाली आहे. देशातील सर्व राज्य आणि घटकांना एकत्रितपणे देशाच्या आर्थिक प्रगतीचा लाभ मिळावा यासाठी मोदी सरकारनं व्यवस्था केली आहे. देशातील महागाईबाबतच्या कठीण आव्हानांवर मात करण्यात येत असून महागाईचे आकडे खाली आले आहेत.
रेल्वे आणि पायाभूत सुविधा
- ऊर्जा, सिमेंट आणि बंदरसाठी नवीन 3 कॉरिडॉर तयार करणार, जसे की कॉरिडॉर सध्या सुरू आहेत
- FY25 मध्ये पायाभूत सुविधांवर 11.1 टक्के अधिक खर्च केले जातील
- 40 हजार साधे डबे वंदे भारत डब्यांमध्ये रुपांतरित करणार
- नवीन सुरू झालेल्या रेल्वे लाईनवर सध्या 1.3 कोटी प्रवासी प्रवास करतात
- पाच एकात्मिक ॲक्वा पार्क स्थापन करणार