कोटा Precautions Under NEET UG : देशभरातील तब्बल 544 शहरांमध्ये आज (5 मे) वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीट (NEET) घेतली जाणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ही भारताबाहेरील 14 शहरांमध्ये देखील ऑफलाइन पद्धतीनं या परीक्षेचं आयोजन करते. दुपारी 2 ते 5.20 या वेळेत 13 भाषांमध्ये ही परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी परीक्षा केंद्रांवर अनेक नियम आहे. हे नियम मुलांना पाळावे लागणार आहे. नियम न पाळणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाईदेखील होई शकते. विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर कोणती काळजी घ्यावी या बाबतची मार्गदर्शक तत्त्वे जाणून घ्या.
नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे समन्वयक राजस्थान प्रदीप सिंह गौर यांनी सांगितलं की, "परीक्षेचं प्रवेशपत्र 3 पानांचं आहे, यामध्ये पहिलं पान स्वयं-घोषणापत्र आहे. दुसरं पान पोस्टकार्ड आकाराच्या फोटोंसाठी आहे. तसंच सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म भरून परीक्षा केंद्रावर न्यावा लागेल. या स्वयंघोषणामध्ये तीन बॉक्स दिलेले आहेत. पहिल्या बॉक्समध्ये अर्ज करताना अपलोड केलेले रंगीत छायाचित्र चिकटवावं लागेल. दुसऱ्या बॉक्समध्ये डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा, तर तिसरा बॉक्स विद्यार्थ्याने परीक्षा हॉलमध्येच भरायचाय. ऑनलाइन अर्ज करताना उमेदवाराला स्वाक्षरी अपलोड करावी लागेल. परंतु ही स्वाक्षरी परीक्षा केंद्रावरील निरीक्षकांसमोरच करावी लागेल.
या गोष्टी लक्षात ठेवा:
- पारदर्शक पाण्याची बॉटल आणि सॅनिटायझर बाळगता येईल.
- सोबत सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म न्यायला विसरू नका.
- सोल्ड शूज तसंच जाड कापड असलेले कपडे घातलेल्यांना प्रवेश दिला जाणार नाही.
- प्रवेशपत्रासोबत, विद्यार्थ्यांना सरकारनं जारी केलेले कोणतेही मूळ ओळखपत्रदेखील सोबत ठेवावं लागेल. यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर आयडी, 12 वी बोर्ड ॲडमिट कार्ड, पासपोर्ट, रेशन कार्ड, फोटो असलेली आधार एनरोलमेंट स्लिप वैध असेल. ही कागदपत्रे फोटोकॉपीमध्ये किंवा मोबाईल फोनवर दाखवणं वैध ठरणार नाही.
- परीक्षेची वेळ संपल्यानंतर, जोपर्यंत पर्यवेक्षक सूचना देत नाहीत तोपर्यंत विद्यार्थ्यानं आपली जागा सोडू नये.
- परीक्षेनंतर, विद्यार्थ्यांनी OMR शीटची मूळ आणि कार्यालयीन प्रत आणि प्रवेशपत्र निरीक्षकांना द्यावे. तसं न केल्यास परीक्षेतून अपात्रतेसह विद्यार्थ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल.