बीजापूर Police Naxalite Encounter : छत्तीसगडमधील बीजापुरमध्ये शुक्रवारी नक्षलविरोधी अभियानात जवानांना मोठं यश मिळालंय. शुक्रवारी झालेल्या पोलीस-नक्षल चकमकीत जवानांनी 12 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातलंय. सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर पोलीस पथक ठार झालेल्या नक्षलवाद्यांची ओळख पटवण्यात व्यस्त आहे. ठार झालेल्या नक्षलवाद्यांची संख्या वाढू शकते. परिसरात सतत शोध सुरु आहे. बस्तर डीआयजी कमलोचन कश्यप यांनी याला दुजोरा दिलाय.
काय म्हणाले मुख्यमंत्री विष्णू देव साई : यावर छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई यांची यावर प्रतिक्रिया समोर आली असून, त्यांनी ऑपरेशनच्या यशासाठी जवानांचं अभिनंदन केलंय. ते म्हणाले की, ठार झालेल्या नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. बीजापुरमध्ये पोलिस-नक्षल चकमकीत 12 नक्षलवादी ठार झाले आहेत. छत्तीसगडमध्ये आम्ही सत्तेत आल्यापासून आम्ही नक्षलवादाचा जोरदार मुकाबला करत आहोत. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचीही इच्छा आहे की छत्तीसगडमधून नक्षलवाद संपला पाहिजे आणि जर दुहेरी इंजिन सरकार असेल तर त्याचे फायदे आम्हालाही मिळायला हवेत, असं साई म्हणाले.