महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मशरूम गर्ल दिव्या रावत आणि तिचा भाऊ राजपाल रावत यांना पुणे पोलिसांनी केली अटक - pune police

Uttarakhand Mushroom Girl Arrested : पुण्यातील पौड पोलीस ठाण्यात एका व्यावसायिकानं मशरूम गर्ल दिव्या रावत आणि तिचा भाऊ राजपाल रावत यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पुणे पोलिसांनी मशरूम गर्ल दिव्या रावत आणि तिच्या भावाला अटक केली आहे. दोघांना अटक केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे.

mushroom girl divya rawat and her brother rajpal rawat have been arrested by pune police
मशरूम गर्ल दिव्या रावतला अटक

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 12, 2024, 4:21 PM IST

Updated : Feb 12, 2024, 7:34 PM IST

वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज कुमार यादव यांची प्रतिक्रिया

पुणे Uttarakhand Mushroom Girl Arrested :व्यवसायात भगिदाराचे आमिष दाखवून उत्तराखंड येथील मशरूम गर्ल दिव्या रावत आणि तिचा भाऊ राजपाल रावत याने पुण्यातील एका माणसाची तब्बल 57,58,197 रुपयांची आर्थिक फसवणूक केल्यानं पुण्यातील पौड ग्रामीण पोलिसांनी या दोघांना 9 फेब्रुवारी रोजी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार यासंदर्भात जितेंद्र नंदकिशोर भाखाडा यांनी 2022 मध्ये तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास करत दिव्या रावत (रा. मोथारावाला,डेहराडून) आणि राजपाल रावत याला अटक केली आहे. तसंच सोमवारी (12 फेब्रुवारी) या दोघांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.


काय आहे प्रकरण : याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार जितेंद्र नंदकिशोर भाखाडा (रा. पुणे) यांची 'प्रिक्वेल सिस्टम्स' आणि त्यांच्या पत्नी 'नमस्या प्रिंसीजन्स' या नावाची कंसल्टेंसीचे काम करणारी फर्म असून दोघंही ऑनलाईन आणि फोनच्या माध्यमातून हे फर्म चालवित होते. मात्र, जितेंद्र भाखाडा हे आजारी पडल्यावर त्यांनी तांत्रिकशेती उद्योगात जाण्याचा निर्णय घेतला. यानुसार त्यांनी सोशल मीडियावर यासंदर्भात शोध घेण्यास सुरुवात केली. यादरम्यान फेसबुकवर त्यांना डेहराडून या ठिकाणी असलेल्या मशरूमच्या तांत्रिकशेती विषयी माहिती मिळाली. त्यानंतर जितेंद्र भाखाडा यांनी याविषयी दिव्या रावत यांची बहीण शकुंतला रॉय यांच्याशी फोनवर चर्चा केली. शकुंतला रॉय यांनी जितेंद्र यांनी 5 ते 6 दिवसांच्या प्रशिक्षणासाठी डेहराडूनमधील मोथरोवाला याठिकाणी बोलविले.


त्यानंतर जानेवारी 2019 मध्ये जितेंद्र भाखाडा मोथरोवाला डेहराडून येथे प्रशिक्षणासाठी गेले असता तेथे त्यांची भेट दिव्या रावतशी झाली. दिव्या रावतने जितेंद्र भाखाडा यांना मशरूमच्या संपुर्ण तांत्रिकशेती संदर्भात प्रशिक्षण दिले. प्रशिक्षणानंतर जितेंद्र पुण्यात परतले. त्यानंतर त्यांनी घरुनच दिव्या रावतच्या सोम्या फुडस प्रा.लि., कोरडीसेफ फिटनेस, द माउंटन मशरूम या फर्म्सला मदत केली. तेव्हा दिव्या रावतने जितेंद्र यांना पुढं जाऊन पार्टनरशीपमध्ये काम करु असं आश्वासन दिलं. मात्र, 2019 ते 2022 या कालावधीत जितेंद्र यांच्याकडून काम करून घेऊन तसंच गुंतवणूक करून त्याचे 57, 58, 197 रूपये परत न देता विश्वासघात करून फसवणूक करण्यात आली.



3 दिवसांची पोलीस कोठडी :याविषयी अधिक माहिती देत पौंड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज कुमार यादव म्हणाले की, "याप्रकरणी 2022 ला गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर 2023 ला पुण्यातून पथक उत्तराखंड येथे पाठवल्यानंतर तिथं संपूर्ण तपास करण्यात आला. तपासानंतर दिव्या रावत आणि तिचा भाऊ राजपाल रावत याला 9 फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली. तसंच याप्रकरणी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं असता न्यायालयानं 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. आज या दोन्ही आरोपींना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे."

हेही वाचा -

  1. Lalit Patil Case : ड्रग्ज माफिया ललित पाटीलच्या मालमत्तेची चौकशी सुरू; पुणे पोलीस दोन दिवसांपासून नाशकात तळ ठोकून
  2. Lalit Patil Drug Case: ललित पाटील ड्रग्स प्रकरणात पुणे पोलिसांची मोठी कारवाई, नाशिकमधून दोन महिलांना घेतले ताब्यात
  3. Milind Ekbote : पुण्येश्वर मंदिराच्या बाजूला असलेलं अतिक्रमण हटवा अन्यथा...; मिलिंद एकबोटे यांचं वादग्रस्त विधान
Last Updated : Feb 12, 2024, 7:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details