नवी दिल्ली :बांगलादेशमध्ये अल्पसंख्यांकावर हल्ले होत असल्यानं देशातील अनेक नेत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. अशा स्थितीत बांगलादेशच्या हंगामी सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आज दूरध्वनीवरून चर्चा केली. चर्चेदरम्यान, पंतप्रधानांनी बांगलादेशमधील लोकशाही, स्थिरता, शांततापूर्ण प्रगतीसाठी पाठिंबा दर्शविला. बांगलादेशमधील विविध विकास उपक्रमांना पाठिंबा देण्याच्या भारत वचनबद्ध राहणार असल्याचं म्हटलं.
अल्पसंख्याक समुदायांवर हल्ले : बांगलादेशातील हिंदू आणि इतर सर्व अल्पसंख्याक समुदायांची सुरक्षा आणि संरक्षण करण्याचं अवाहन पंतप्रधानांनी केलं. त्यावर मोहम्मद युनूस यांनी काळजीवाहू सरकारकडून बांगलादेशातील हिंदू आणि सर्व अल्पसंख्याक गटांच्या सुरक्षेला आणि संरक्षणास प्राधान्य देईल, अशी ग्वाही. दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय अधिक बळकट करण्यावर चर्चा केली. सरकारी नोकरीतील आरक्षणाला विरोध केल्यानंतर विद्यार्थ्यांनी संपूर्ण बांगलादेशमध्ये निदर्शने केली. देशातील तापलेलं वातावरण पाहता शेख हसीना यांनी 5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर बांगलादेशमध्ये काळजीवाहू सरकार अस्तित्वात आलं. सध्या, शेख हसीना भारतात सुरक्षित आहेत. नोबेल पारितोषिक विजेते मुहम्मद युनूस हे अंतरिम सरकारचे नेतृत्व करत असून निवडणुकांची तयारी करण्यासाठी करत आहेत.
- काय आहे बांगलादेशमध्ये स्थिती? :देशातील 48 जिल्ह्यांमध्ये 278 ठिकाणी हिंदू कुटुंबांना हिंसाचाराचा सामना करावा लागला. बीजेएचएमचे अध्यक्ष प्रभास चंद्र रॉय म्हणाले, "सरकार बदलल्यानंतर सर्वात आधी हिंदूंवर हल्ले होतात. पूर्वीच्या तुलनेत हिंदूवर हल्ले वाढले आहेत. आम्ही येथे जन्मलो आहोत. या देशात सुरक्षित वातावरणात जगण्याचा आम्हाला अधिकार आहे."