मेरठ - Lok Sabha Elections 2024 : भारतीय जनता पक्षानं रामायण मालिकेत रामाची भूमिका साकारणाऱ्या अरुण गोविल यांना उत्तर प्रदेशातील मेरठ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. निवडणूक प्रचारादरम्यान त्यांनी ईटीव्ही भारतशी संवाद साधला. मात्र, काही प्रश्नांची उत्तरे देण्याचे ते टाळत असल्याचे दिसले.
- प्रश्नः मेरठमध्ये तुमच्यासाठी कोणत्या प्रकारचे वातावरण आहे. निवडून येण्याची काही शक्यता आहे का?
उत्तर : वातावरण खूप चांगले आहे. मेरठसह देशात सर्वत्र उत्सवाचे वातावरण आहे. जिथे पण मी जात आहे तिथे माझे चांगले स्वागत होतं आहे. मला भरभरून प्रेम मिळत आहे. लोकांकडून मिळत असलेल्या पाठिंब्यामुळे मी खूश आहे.
- प्रश्न : निवडणूक लढवण्याचा तुमचा पहिला अनुभव आहे, कसे वाटत आहे?
उत्तर : हो माझा पहिला अनुभव आहे. सध्या आम्ही प्रचार करत आहोत. अर्ज भरल्यानंतर प्रचाराची शैली आणि पद्धत याबाबत रणनीती बनवू आणि त्या आधारे पुढील काम करेन.
- प्रश्न : तुमचे बालपण मेरठमध्ये गेले, तुम्ही इथल्या रस्त्यांवर खेळत मोठे झालात, आज तुम्हाला काय बदल दिसत आहेत? तुम्ही काय नियोजन करत आहात?
उत्तर: मी एका वेळी एकच काम करतो, जे पहिले काम हाती येते तेच मी पुढे करतो. त्यापलीकडे मी चार गोष्टींचा विचार करू शकत नाही. सध्या जनसंपर्क आणि मतदारांना प्रेरित करणे हेच उद्दिष्ट आहे. त्यानंतर निकाल येतील आणि निवड झाल्यावर काय काम करावे लागेल याचा विचार करेन.
- प्रश्न: रामायणातील 'राम'साठी 'सीता' आणि 'लक्ष्मण' प्रचार करतील का?