मार्गदर्शी चिट फंडच्या 112 व्या शाखेचं उद्घाटन जगित्याल ( हैदराबाद) Margadarsi Chit Fund : मार्गदर्शी चिट फंड प्रायव्हेट लिमिटेडनं जगित्याल जिल्हा केंद्रात बस डेपोसमोर आपली नवीन शाखा उघडली आहे. मार्गदर्शीची ही 112 वी शाखा असून ईनाडूच्या एमडी सी.एच. किरण यांनी व्हर्च्यूअल पद्धतीनं शुभेच्छा दिल्या. तर यावेळी मार्गदर्शीचे उपाध्यक्ष पी. राजाजी यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलन करून कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. तसंच विभाग व्यवस्थापक म्हणून रजनीकांत यांच्याकडं नवीन शाखेची जबाबदारी देण्यात आली. या कार्यक्रमात चिट-फंड संस्थेचे प्रतिनिधी आणि ग्राहक उत्साहानं सहभागी झाले होते.
तेलंगणा राज्यातील 36 वी शाखा : व्हर्च्यूअल पद्धतीनं करण्यात आलेल्या भाषणात, ईनाडूच्या व्यवस्थापकीय संचालक किरण यांनी नवीन कार्यालयीन कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. त्यांनी सांगितलं की, " जगित्याल शाखा ही तेलंगणा राज्यातील 36 वी शाखा आहे. चार राज्यांमध्ये शाखांची संख्या 112 आता झाली आहे. तसंच जगित्यालची मार्गदर्शी शाखा ग्राहकांच्या सेवेत दिवसेंदिवस प्रगती करत राहो," अशा शुभेच्छा ईनाडूच्या व्यवस्थापकीय संचालक किरण यांनी दिल्या. तसंच मार्गदर्शीनं गेल्या 60 वर्षांतील दृढनिश्चय आणि प्रामाणिकपणामुळं ग्राहकांचा विश्वास टिकवून ठेवलाय, असंही त्या यावेळी म्हणाल्या.
गेल्या 60 वर्षात लाखो लोकांनी मार्गदर्शीवर विश्वास ठेवला आहे. कंपनीच्या वाढीचं मुख्य कारण म्हणजे कोणत्याही गरजेसाठी मार्गदर्शी उपलब्ध असल्याचा ग्राहकांचा विश्वास आहे. तसंच ते आधुनिक तंत्रज्ञानासह ग्राहकांपर्यंत पोहोचत आहेत. प्रत्येकासाठी त्यांच्या गरजेनुसार सुविधा उपलब्ध आहेत- शैलजा किरण, ईनाडूच्या व्यवस्थापकीय संचालक
1962 मध्ये झाली सुरुवात : मार्गदर्शी चिट फंड प्रायव्हेट लिमिटेड ऑक्टोबर 1962 मध्ये फक्त दोन कर्मचाऱ्यांसह सुरू झाली. या कंपनीत आता 5,000 पेक्षा जास्त कर्मचारी आहेत. 112 शाखा असलेली एक आघाडीची कंपनी बनली आहे. तेलंगणा आणि आंध्र प्रदेश तसंच तामिळनाडू आणि कर्नाटकातही या कंपनीनं चांगला नावलौकिक मिळवला आहे. रामोजी समुहाचे अध्यक्ष रामोजी राव यांनी स्थापन केलेली ही कंपनी सहा दशकांहून अधिककाळ सुमारे 60 लाख ग्राहकांना सेवा देत आहे.
हेही वाचा -
- मार्गदर्शीला मोठा दिलासा; 1050 कोटींची मालमत्ता जप्तीच्या याचिका न्यायालयानं फेटाळल्या, आंध्रप्रदेश सीआयडीला दणका
- "लुक आउट नोटीस न्यायालयाचा अवमान आहे की नाही?", मार्गदर्शी प्रकरणात उच्च न्यायालयाचा सीआयडीला सवाल
- Margadarsi Chit Fund : आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचा रामोजी राव, एमडी शैलजा किरण यांना मोठा दिलासा; तक्रारदारासह सीआयडीला चपराक देत बजावली नोटीस
- AP HC On Margadarsi Accounts :आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाकडून मार्गदर्शी शाखांना दिलेल्या सर्व पोलीस नोटिसांना स्थगिती