महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Building Collapses In Delhi : इमारत कोसळून दोन कामगारांचा बळी, एक जण गंभीर - Building Collapses In Delhi

Building Collapses In Delhi : दिल्लीतील कबीरनगर परिसरात एक दुमजली इमारत कोसळून दोन कामगारांचा मृत्यू झाला. या घटनेत एक कामगार गंभीर जखमी झाला आहे.

Building Collapses In Delhi
संपादित छायाचित्र

By ANI

Published : Mar 21, 2024, 9:33 AM IST

नवी दिल्ली Building Collapses In Delhi : दुमजली इमारत कोसळून दोन कामगारांचा मृत्यू झाल्यानं मोठी खळबळ उडाली. अर्शद (30) आणि तौहीद (20) अशी मृत कामगारांची नावं आहेत. तर रेहान (22) हा या घटनेत गंभीर जखमी झाला आहे. ही घटना दिल्लीतील कबीरनगर परिसरात गुरुवारी पहाटे 02.16 वाजताच्या सुमारास घडली. घटनेच्या वेळी इमारतीचा पहिला मजला रिकामा असल्यानं मोठी दुर्घटना टळली, अशी माहिती उत्तर पूर्व विभागाचे पोलीस उपायुक्त जॉय तिर्की यांनी वृत्तसंस्थेला दिली. हे कामगार या दुमजली इमारतीत जीन्स कटींगचं काम करत होते, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

दुमजली इमारत कोसळली :कबीरनगरमध्ये गुरुवारी पहाटे दुमजली इमारत कोसळून तीन कामगार ढिगाऱ्याखाली दबले होते. घटना घडल्यानंतर अधिकाऱ्यांना पहाटे 02.16 वाजता फोन आल्यानंतर त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी मलब्याखाली तीन कामगार दबल्याची माहिती अधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यामुळे घटनास्थळावर तत्काळ बचावकार्य करण्यात आलं.

दोन कामगारांचा मृत्यू, एक गंभीर :कबीरनगर परिसरातील या दुमजली इमारतीत कोसळलेल्या ढिगाऱ्याखाली तीन कामगार दबले होते. मलब्याखालून बचावण्यात आलेल्या कामगारांना जीटीबी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यावेळी डॉक्टरांनी दोघांना तपासून मृत घोषित केलं. तर एका कामगाराची प्रकृती गंभीर असल्याची माहिती रुग्णालय सूत्रांनी वृत्तसंस्थेला दिली आहे.

इमारत मालकाचा शोध सुरू :दुमजली इमारत कोसळली असून त्यात अर्शद (30) आणि तौहीद (20) या दोघांचा मृत्यू झाला आहे. तर या घटनेत रेहान ( 22 ) हा गंभीर जखमी झाला आहे. शाहीद असं इमारतीच्या मालकाचं नाव असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त जॉय तिर्की यांनी यावेळी दिली.

हेही वाचा :

  1. Dombivli Building Collapse : तीन मजली इमारत कोसळली; दोघांचा मृत्यू, बचावकार्य थांबवलं
  2. Defense College building collapsed: पत्त्याप्रमाणे कोसळली डिफेन्स कॉलेजची इमारत, पहा व्हिडिओ
  3. Watch Video: दुमजली इमारत नाल्यात कोसळली, घर प्रमुखाच्या प्रसंगावधाने बचावले 6 जण; पहा व्हिडिओ

ABOUT THE AUTHOR

...view details