अहमदाबाद: महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री कोण असणार आहेत? याबाबत भाजपानं अद्याप नाव जाहीर केलेलं नाही. अशातच शपथविधी सोहळ्यापूर्वी भाजपाचे केंद्रीय पक्ष निरीक्षक म्हणून गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांनी गुजरातमध्ये माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्रिपदाच्या निवडीबाबत माहिती दिली.
गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी म्हणाले, " उद्या भाजपाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर भाजपाच्या गटनेत्याचं नाव जाहीर करणार आहोत. मी आज संध्याकाळी मुंबईत येणार आहे. तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन रात्री यादेखील रात्री मुंबईत पोहोचणार आहेत. उद्या सकाळी ११ वाजता भाजपा आमदारांची बैठक होणार आहे. तिथे आमदारांशी चर्चा आणि विचारून पक्षाच्या गटनेत्याची निवड केली जाणार आहे. सर्वसंमतीनं गटनेत पदासाठी नाव निवडले जाईल. त्यानंतर हायकमांडला कळवून गटनेतपदाच्या नावाची घोषणा होईल". सर्वाधिक जागा भाजपाला असल्यानं मुख्यमंत्री पद भाजपाला मिळेल," असं भाजपाचे पक्ष निरीक्षक रुपाणी यांनी म्हटलं.
गटनेताच मुख्यमंत्री होणार?महायुती बहुमतात येऊनही अद्याप मुख्यमंत्रिपदी कोण असणा, याबाबत अद्याप महायुतीकडून नाव जाहीर करण्यात आलेलं नाही. महायुतीमधील नेत्यांचा मंत्रिपदासाठी 5 डिसेंबरला शपथविधी सोहळा होणार आहे. त्यापूर्वी 4 डिसेंबरला भाजपाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. या बैठकीसाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आज मुंबईत दाखल होणार आहेत. भाजपाच्या विधिमंडळाच्या पक्षाच्या गटनेत्याची उद्या निवड होणार आहे. हाच गटनेता महायुतीचा मुख्यमंत्री असण्याची दाट शक्यता आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदासाठी आघाडीवर आहेत.शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससला पुन्हा प्रत्येकी एक उपमुख्यमंत्रीपद दिले जाण्याची शक्यता आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीच भाजपाच्या निर्णयाला पूर्ण समर्थन देणार असल्याचं जाहीर केलं आहे.
हेही वाचा
- निर्मला सीतारामण अन् विजय रुपाणी भाजपाचे पक्ष निरीक्षक; चार डिसेंबरला विधिमंडळ पक्षाची बैठक
- शपथविधीच्या सोहळ्याची तयारी कशी आहे? प्रथमच महायुतीच्या नेत्यांनी एकत्रितपणं केली पाहणी