छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) - अल्पसंख्याक आयुक्तालय स्थापन करू नये या मागणीसाठी काँग्रेस पक्षातर्फे तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी पोलिसांसोबत त्यांची झटपट झाली आणि अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ओढून गाडीत बसवले. विशेष म्हणजे आजच सायंकाळी अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते या कार्यालयाचं उद्घाटन होणार होतं. मात्र त्याआधीच काँग्रेसनं मोठा राडा या ठिकाणी केला. अल्पसंख्याक विकास विभागातर्फे अल्पसंख्याक आयुक्त कार्यालय स्थापन करण्यात येणार आहे.
विधानपरिषद निवडणुकीत दुपारी एक वाजेपर्यंत सरासरी 39 टक्के मतदान - Breaking News Today - BREAKING NEWS TODAY
Published : Jun 26, 2024, 7:50 AM IST
|Updated : Jun 26, 2024, 5:04 PM IST
मुंबई- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर पुणे महानगरपालिकेनं 26 हॉटेलवर कारवाई केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश दिल्यानंतर पालिका ॲक्शन मोडवर आली. पुणे महानगरपालिकेनं 37 हजार चौरस फुटांचा अनधिकृत बांधकाम पाडले. यापुढेही पुणे महानगरपालिकेची कारवाई सुरूच राहणार आहे. दोन दिवसांपूर्वी पुण्यात एल3 या बारमध्ये ड्रग सेवन केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कडक कारवाई करण्याचे आदेश दिले.
- राज्यातील ताज्या घडामोडींसह देश-विदेशातील ब्रेकिंग न्यूज वाचा हे ईटीव्ही भारतचे लाईव्ह पेज.
LIVE FEED
अल्पसंख्याक आयुक्तालय स्थापनेविरोदात काँग्रेस पक्षातर्फे निदर्शने
निवडणुकीत दुपारी एक वाजेपर्यंत सरासरी 39 टक्के मतदान
विधानपरिषद शिक्षक, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत दुपारी एक वाजेपर्यंत सरासरी 39 टक्के मतदान
मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठीचे मतदान आज होत आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरळितपणे सुरु झाली. दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३९ टक्के मतदान झालं आहे. कोकण पदवीधर मतदारसंघातील एकूण मतदार संख्या २,२३,४०८ असून मतदान केलेल्यांची संख्या ७९,६४१ इतकी आहे. दुपारी १ वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी ३५.६५ इतकी आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघ एकूण मतदार संख्या १,२०,७७१ असून मतदान केलेल्यांची संख्या ४६,३७५ इतकी आहे. दुपारी १ वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी ३८.३९ इतकी आहे. मुंबई शिक्षक मतदारसंघ एकूण मतदार संख्या १५,८३९ असून मतदान केलेल्यांची संख्या ६,४११ इतकी आहे. दुपारी १ वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी ४०.४८ इतकी आहे. नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ एकूण मतदार संख्या ६९,३६८ असून मतदान केलेल्यांची संख्या ३०,१५६ इतकी आहे. दुपारी १ वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी ४३.४७ इतकी आहे, असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
आणीबाणीवरून लोकसभेत गदारोळ, उद्यापर्यंत लोकसभेचं कामकाज तहकूब
1975 मध्ये आणीबाणी लागू केल्यानं सत्ताधाऱ्यांनी निषेध केला. त्यानंतर सभागृहात मोठा गदारोळ झाला. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी लोकसभेचे कामकाज उद्या, २७ जून रोजी पुन्हा तहकूब होणार आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले, " 1975 मध्ये आणीबाणी लागू करण्याच्या निर्णयाचा सभागृहाकडून तीव्र निषेध करण्यात येत आहे. आणीबाणीला विरोध करत लढा देणारे आणि भारताच्या लोकशाहीच्या रक्षणाची जबाबदारी पार पाडणाऱ्या सर्व लोकांच्या निर्धाराचे आम्ही कौतुक करतो. 25 जून 1975 हा दिवस देशाच्या इतिहासात एक काळा अध्याय म्हणून ओळखला जाईल. या दिवशी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या राज्यघटनेवर हल्ला केला होता. लोकशाही मूल्यांसह अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली होती."
हिजाब बंदी विरोधातील याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली
हिजाब बंदी विरोधातील याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. कॉलेजमधील विद्यार्थिनींनी शाळेच्या ड्रेसकोडला विरोध करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
ओम बिर्ला यांची सलग दुसऱ्यांदा लोकसभा अध्यक्ष पदी निवड
सलग दुसऱ्यांदा ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्ष पदी निवड झाली. आवाजी मतदानानं ही निवड झाली. एनडीएच्या के. सुरेश यांचा मतदानात पराभव झाला. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ओम बिर्ला यांचे अभिनंदन केले.
पंतप्रधान मोदींकडून ओम बिर्ला तर अरविंद सावंत यांच्याकडून के सुरेश यांच्या नावाचा प्रस्ताव
पंतप्रधान मोदी यांनी लोकसभा अध्यक्ष पदासाठी ओम बिर्ला यांच्या नावाचा प्रस्ताव दिला आहे. विरोधी पक्षाकडून शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी के. सुरेश यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला आहे. ओम बिर्ला यांच्या नावाला 13 पक्षांनी समर्थन दिले. सुप्रिया सुळे यांनी के. सुरेश यांच्या नावाला समर्थन दिले.
लोकसभा सभापती पदासाठी थोड्याच वेळात मतदान, सलग दुसऱ्यांदा लोकसभा सभापती पदी ओम प्रकाश बिर्ला यांची निवड होणार का??
लोकसभा सभापती पदासाठी थोड्याच वेळात मतदान होणार आहे. एनडीएकडून ओम बिर्ला तर इंडिया आघाडीकडून के. सुरेश हे लोकसभा सभापती पदाचे उमेदवार आहेत. सलग दुसऱ्यांदा लोकसभा सभापती पदी ओम बिर्ला यांची निवड होणार का, हे थोड्याच वेळात समजणार आहे. सलग तिसऱ्या दिवशी नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सुरू आहे. 7 खासदारांनी शपथ घेतल्यानंतर लोकसभा सभापती पदाची निवडणूक होणार आहे.
लोकसभेच्या सभापती पदी एकमतानं निवड करा, किरेन रिजीजू यांचे विरोधकांना आवाहन
लोकसभा सभापतींच्या पदासाठी आज निवडणूक होणार आहे. यावर संसदेचे कामकाज मंत्री किरे रिजिजू यांनी एनडीएची भूमिका स्पष्ट केली. "आपण सर्व सहकारी आहोत. आपल्याला एकत्र काम करायचे आहे. आम्ही विरोधकांना ऑफर दिल्यानंतर ते स्वीकारतील अशी अपेक्षा होती. मात्र, तसे झाले नाही. लोकसभेचे सभापती पदी एकमतानं निवड करण्याचं आम्ही पुन्हा त्यांना आवाहन करतो. त्यासाठी पूर्वअटी असण्यावर आमचा विश्वास नाही. आपण लोकसभा अध्यक्षांच्या निवडीवर लक्ष केंद्रित करू. त्यानंतर इतर मुद्द्यावर चर्चा करू."
शाळेत चक्कर येऊन पडल्यानंतर सहावीमधील विद्यार्थिनीचा मृत्यू
नाशिकच्या सिडको परिसरातील एका शाळेत 6 वी मध्ये शिकणाऱ्या 11 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आज सकाळी शाळेत गेल्यानंतर ती चक्कर येऊन खाली पडली. याध्ये तिचा मृत्यू झाल्याची माहिती शाळेतील शिक्षकांनी दिली आहे.पण तिला नेमका त्रास काय झाला? हे अद्याप कळू शकलेलं नाही. पोलिसांच्या माहितीनुसार, दिव्या त्रिपाठी (वय 11 ) असं या विद्यार्थीनीचं नाव असून ती सिडको भागातील एका खाजगी शाळेत सहावीत शिकत होती. शवविच्छेदनानंतरच दिव्याचा मृत्यू नेमका कशाने झाला? हे याचे कारण समोर समोर येईल असं डॉक्टरांनी सांगितलं.
नागपूर मेट्रोकडून वेळेत बदल होताच प्रवासी संख्येत वाढ
२४ जूनपासून नवीन शैक्षणिक सत्र सुरू झाले आहे. शाळकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे वेळापत्रक लक्षात घेता नागपूर मेट्रोनं ट्रेनच्या वेळापत्रकातही बदल केलाय. नागपूर मेट्रोच्या बदललेल्या वेळापत्रकानुसार आता प्रत्येक १० मिनिटांनी मेट्रो ट्रेन उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागपूर मेट्रोच्या प्रवासी संख्येमध्ये मोठी वाढ झाली आहे.
पॅलेस्टाईनचा उल्लेख करणं गुन्हा आहे का? संजय राऊत यांचा सवाल
खासदार असुद्दीन औवेसी यांनी खासदारकीची शपथ घेताना जय पॅलेस्टाईन अशी घोषणा केली होती. त्यावरून त्यांच्यावर एनडीएमधील नेत्यांनी टीका केली. यावर खासदार राऊत म्हणाले, पॅलेस्टाईन बाबत सरकारची काय भूमिका आहे.
पॅलेस्टाईनचा उल्लेख करणं गुन्हा आहे का? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी केला. मोदींना पळ काढता येणार नाही. कारण, राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते आहेत," असा टोलादेखील खासदार राऊत यांनी लगावला.
राज्यातील दिग्गज खेळाडुंनी आमरण उपोषण करण्याचा दिला इशारा, काय आहे मागणी?
ऑलिंपिक एशियन गेम्स खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्ती संदर्भात शासन निर्णय असूनही राज्य सरकानं सात वर्षे टाळाटाळ केल्याचा राज्यातील दिग्गज खेळाडूंनी आरोप केला. या खेळाडूंनी उद्या आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. यामध्ये अर्जुन पुरस्कार विजेती कविता राऊत, अर्जुन पुरस्कार विजेता दत्तू भोकनळ, छत्रपती पुरस्कार प्राप्त सायली किरीपाले, छत्रपती पुरस्कार प्राप्त स्नेहल शिंदे, छत्रपत्री पुरस्कार प्राप्त ऋषांक देवडिका आणि छत्रपती पुरस्कार प्राप्त गिरीश इर्णाक हे खेळाडू आहेत. विधानसभेच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी खेळाडूंनी उपोषणाचा इशारा दिल्यानं सरकारची कोंडी होणार आहे.
मुकेश अंबानी यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेले मुलाच्या विवाहाचं निमंत्रण
रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाहाचे निमंत्रण दिले. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह 12 जुलैला मुंबईत होणार आहे.
सीबीआयकडून तिहारमध्ये अरविंद केजरीवाल यांची चौकशी, आज पुन्हा न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता
नवी दिल्ली- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत आणखी भर पडणार आहे. ईडीनं मनी लाँड्रिंग प्रकरणात कारवाई केल्यानंतर सीबीआयकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीबीआयनं मुख्यमंत्री केजरीवाल यांची तिहार तुरुंगात चौकशी केली. बुधवारी त्यांना आज न्यायालयात हजर करण्याची तयारीही सुरू आहे.
मी लोकशाही वाचवण्याकरिता आज मतदान केले-किशोरी पेडणेकर
मुंबईच्या माजी महापौर तथा शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी विधानपरिषदेच्या निवडणुकीकरिता मतदान केले. मतदानानंतर माजी महापौर पेडणेकर म्हणाल्या, " मी लोकशाही वाचवण्याकरिता आज मतदान केले आहे. मतदान करून मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मला दिलेला अधिकार बजावला आहे."
कोकण पदवीधर मतदार संघातील मतदानाकरिता सकाळी सात वाजल्यापासून मतदारांचा उत्साह
कोकण पदवीधर मतदार संघातील मतदान केंद्रात पदवीधर मतदारांचा सकाळी सात वाजल्यापासून उत्स्फूर्त प्रतिसाद दिसला. ठाणे जिल्ह्यात एकूण 98 हजार पदवीधर मतदार आहेत. कोकण पदवीधर मतदार संघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट लढत आहे. या निवडणुकीत 13 उमेदवार रिंगणात आहेत.
मुंबईत पदवीधर मतदानासाठी नव मतदारांचा उत्साह, मतदान केंद्रावर नव मतदारांची रांग
महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या चार जागांसाठी आज मतदान होत आहे. मुंबईत पदवीधर मतदानासाठी नव मतदारांचा उत्साह दिसून येत आहे. मुंबई मतदान केंद्रावर नव मतदारांची रांग लागली आहे. मुंबईमध्ये मुंबई पदवीधर मतदार संघासाठी मतदान होत आहे. मुंबईतील वरळी येथील मुंबई पब्लिक स्कूल या मतदार केंद्रावर मुंबई पदवीधर मतदार संघाचे भाजपचे उमेदवार किरण शेलार यांनी मतदान केले. यंदा शिक्षक व पदवीधर मतदार संघासाठी पहिल्यांदा मतदान करणाऱ्या मतदारांचा टक्काही मोठ्या प्रमाणात आहे.
'नीट' घोटाळ्याचं बीड कनेक्शन, बीड-माजलगावमधी दोघांची संशयितांमध्ये नावे
बीड- देशभरात गाजत असलेल्या नीट घोटाळ्यात लातूर, धाराशिवनंतर आता बीड कनेक्शन उघडलीस आले आहे. जिल्ह्यातील दोन संशयितांची नावे तपासात आली आहेत. त्यामध्ये एक बीडचा तर दुसरा माजलगावचा असल्याचे सांगण्यात येते. नीट घोटाळ्यात या दोघांनाही संशयित म्हणून चौकशीसाठी नांदेड एटीएसनं बोलावून घेतलं होतं. हे दोघेही लातूरच्या एका आरोपीचे सबएजन्ट म्हणून काम पाहात असल्याची माहिती सुत्रांकडून समजते.
केनियातील प्रचंड हिंसाचारानंतर सरकारकडून भारतीय नागरिकांसाठी ॲडव्हायझरी जारी
केनियामध्ये सरकारच्या प्रस्तावित कर वाढीविरोधात जनतेकडून हिंसक निदर्शने करण्यात आली आहेत. नैरोबीमधील हिंसाचारात पाच जणांचा मृत्यू झाला. तर 150 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. केनियातील बिघडलेल्या वातावरणात भारतीय नागरिकांच्या संरक्षणासाठी केंद्र सरकारनं ॲडव्हायजरी जारी केली आहे. नागरिकांना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचा आणि अनावश्यक हालचाली न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मंगळवारी हजारो लोकांनी केनियाच्या संसदेवर थेट हल्ला केला. त्यानंतर जमावाला आटोक्यात आणण्याकिरता पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. तसेच थेट गोळ्या झाडल्या होत्या.
छत्रपती संभाजीनगरच्या प्रशासनात मोठे बदल, दोन नवीन अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या
छत्रपती संभाजीनगर- राज्य सरकारनं मंगळवारी दिलीप गावडे यांची छत्रपती संभाजीनगरचे नवीन विभागीय आयुक्त म्हणून नियुक्ती केली. तर आयपीएस अधिकारी प्रवीण पवार यांची शहराच्या पोलीस आयुक्त पदी निवड केली.
2004 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी पवार हे सध्या पुण्यात सहपोलीस आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. विभागीय आयुक्त मधुकर अर्दड यांची बदली करण्यात आली आहे.