महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मूळच्या महाराष्ट्राच्या नागा साधू काशीत दाखल, ११ किलोची गदा हातात घेतल्यानं भाविकांमध्ये कुतूहल - MAHAKUMBH MELA 2025

महाशिवरात्रीनिमित्त साधू, संन्यासी वाराणसीमध्ये दाखल होत आहे. यामध्ये मूळच्या महाराष्ट्रातील नागासाध्वी सरला पुरी यांचाही समावेश आहे.

MahaKumbh Mela 2025
महाराष्ट्रातील महिला नागा साध्वी (Source- ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 10, 2025, 12:13 PM IST

Updated : Feb 10, 2025, 1:53 PM IST

वाराणसी- महाकुंभ मेळाव्याला येणारे नागा साधू आणि संन्याशी (MahaKumbh Mela 2025) हे काशीमध्येदेखील येऊ लागले आहेत. सनातन परंपरेतील १३ आखाड्यांपैकी सुमारे सहा आखाड्यांमधील साधू काशीत (वाराणसी) येऊ लागले आहेत. गंगा नदीच्या काठावर मिनी कुंभमेळ्याची झलक दिसून येत आहे. गंगेच्या प्रमुख घाटांवर तंबू उभारण्यात आले आहेत.

ढोल आणि तुतारी वाजवत नागा साधुंनी काशीत प्रवेश केला आहे. जपेश्वर महादेव येथून हे संन्यासी हनुमान घाटावर पोहोचणार आहे. साधू आणि संन्याशी महाशिवरात्रीपर्यंत हनुमान घाटावर तिथेच राहणार आहेत. आखाड्यांच्या परंपरेनुसार काशीमध्ये ते धार्मिक विधी पूर्ण करणार आहेत. महाशिवरात्रीला सर्व आखाड्यांची मिरवणूक त्यांच्या मठ, मंदिरापासून सुरू होईल. शहरात प्रदक्षिणा घालल्यानंतर श्री काशी विश्वनाथ मंदिरात मिरवणूक पोहोचणार आहे.

काशीत मिनी कुंभमेळा (Source- ETV Bharat)

चौथ्या स्नानाची तयारी-नागा साधू सात्विक अन्न बनवून त्यांच्या भक्तीत मग्न दिसत आहे. हरिश्चंद्र घाटावर तळ ठोकणारे जुना आखाड्यातील साधू आणि गदा हातात करणाऱ्या साध्वीदेखील चर्चेत आल्या आहे. गदा धारण करणाऱ्या साध्वी मूळच्या महाराष्ट्राच्या आहेत. त्यांच्या हातात ११ किलो वजनाची गदा आहे. महाकुंभ २०२५ चे तीन शाही स्नान पूर्ण झाले आहेत. आता, चौथ्या स्नानाची तयारी जोरात सुरू आहे. साधूंचे काही गट काशीमध्ये पोहोचू लागले आहेत. शैव पंथातील साधुंचा एक मोठा गट बनारसच्या घाटांवर पोहोचला आहे. अशा परिस्थितीत, जुना आखाड्याशी संबंधित महिला साध्वी सरला पुरीदेखील बनारसमध्ये पोहोचल्या आहेत.

धर्माच्या रक्षणासाठी गदा उचलली:ईटीव्ही भारतशी बोलताना साध्वी सरला पुरी यांनी त्यांच्याविषयी माहिती दिली. महाराज बसंत पुरी यांच्या शिष्या आहेत. त्या मूळच्या महाराष्ट्राच्या आहेत. महाकुंभातील शाही स्नानानंतर त्या काशीला पोहोचल्या आहेत. त्यांनी हरिश्चंद्र घाटावर तंबू उभारला आहे. त्या रामभक्त हनुमानाच्या भक्तीत असतात. धर्माचं रक्षण करण्यासाठी हातात गदा घेतल्याचं त्यांनी सांगितलं. धर्माचं नुकसान करणारे अनेक धर्मद्रोही आहेत. अशा परिस्थितीत, त्या धर्मद्रोहींना धडा शिकवण्यासाठी खांद्यावर गदा घेतल्याचं साध्वी सरला यांनी सांगितलं. साध्वी सरला यांना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक घाटावर येत आहेत. त्यांची अनोखी शैलीदेखील पाहत आहेत. घाटावर चाय बाबा, बासरी बाबा आणि इतर प्रकारचे साधू, आणि संन्यासी दिसून येत आहेत.

हेही वाचा-

  1. 'कालीन भैया' महाकुंभात, पंकज त्रिपाठी यांनी कुटुंबासह केलं पवित्र स्नान...
  2. पंतप्रधान मोदींनी महाकुंभ मेळ्यात केलं स्नान; अमृत स्नान सोडून मोदींनी आजचा दिवस का निवडला?
  3. महाकुंभ मेळाव्याला जायचंय? तीन दिवस धावणार विशेष 'महाकुंभ एक्सप्रेस'! जाणून घ्या वेळापत्रक
Last Updated : Feb 10, 2025, 1:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details