महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

महिला दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा, सोशल मीडियावर पोस्ट करत 'ही' दिली माहिती - LPG cylinder Price

LPG cylinder Price : आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एलपीजी सिलिंडरच्या किंमती कमी करण्याची घोषणा केलीय. महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर ही घोषणा केली.

महिला दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती
महिला दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 8, 2024, 9:12 AM IST

Updated : Mar 8, 2024, 9:47 AM IST

नवी दिल्ली LPG cylinder Price :आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील महिलांना मोठी भेट देण्याची घोषणा केलीय. घोषणा करताना, पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं की, " भारतीय जनता पक्ष (भाजप) नेतृत्वाखालील सरकारनं एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 100 रुपयांची सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर ही माहिती दिली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही घोषणा महत्त्वपूर्ण मानली जातेय.

पंतप्रधानांची काय आहे पोस्ट? :पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय, "आज महिला दिनानिमित्त आम्ही एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 100 रुपयांची सवलत देण्याचा मोठा निर्णय घेतलाय. यामुळं महिला शक्तीचं आयुष्य तर सुसह्य होणार आहे. तसंच कोट्यवधी कुटुंबांचा आर्थिक भार कमी होईल."

पंतप्रधान मोदींनी दिल्या महिला दिनाच्या शुभेच्छा : याशिवाय, आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा देताना ते म्हणाले, "आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा! आम्ही आमच्या महिला शक्तीच्या सामर्थ्याला, धैर्याला आणि जिद्दीला सलाम करतो. त्यांच्या विविध क्षेत्रांतील कामगिरीचं कौतुक करतो. आमचं सरकार शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करतंय.. कृषी, तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रातील उपक्रमांद्वारे महिलांचं सक्षमीकरण करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. हे गेल्या दशकातील आमच्या यशातही दिसून येते."

  • 10 लाख लाभार्थ्यांना अनुदानाचा मिळणार लाभ :यापूर्वी, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेत सरकारनं उज्ज्वला योजनेंतर्गत एलपीजी सिलिंडरवरील 300 रुपयांच्या अनुदानात एका वर्षासाठी वाढ केली होती. सुमारे 10 लाख लाभार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. या लाभार्थ्यांना वर्षभरात 12 सिलिंडरवर अनुदान मिळणार आहे.
  • काय असतील नव्या किंमती : दिल्लीत 14 किलो एलपीजी सिलिंडरची किंमत सध्या 903 रुपये आहे. 100 रुपयांच्या सवलतीनंतर त्याची किंमत 803 रुपये होईल. तर उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना अनुदान दिल्यानंतर त्याची किंमत 603 रुपये होईल.

हेही वाचा :

  1. कलम 370 हटवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच काश्मीरला देणार भेट, विविध कामांचे करणार उद्घाटन
  2. पिंपरी चिंचवड ते निगडी मेट्रोचं पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन : कार्यक्रमात श्रेयवादाची रंगली लढाई
Last Updated : Mar 8, 2024, 9:47 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details