महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Lok Sabha Elections : मतदान कार्ड नसलं तरी 'नो टेन्शन'; 11 प्रकारच्या ओळखपत्रांचा वापर करू शकता - lok sabha elections

Lok Sabha Elections : लोकसभा निवडणुकांसाठी तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. देशभरात सात टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. मतदान कार्ड नाही असं एक कारण अनेकदा आपण ऐकत असतो. मात्र, आता मतदान कार्ड नसले तरी टेन्शन घेऊ नका. त्यासाठी वाचा ही बातमी...

Etv Bharat
Etv Bharat

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 16, 2024, 7:58 PM IST

मुंबई Lok Sabha Elections : निवडणूक आयोगाचे मतदार ओळखपत्र नसले, तरी मतदारांना आपली ओळख पटवण्यासाठी आयोगानं अकरा पर्याय दिले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी मतदान केंद्रावर आधार कार्डासह अकरा प्रकारच्या कागदपत्रांच्या आधारे मतदारांना मतदान करता येणार आहे. त्यामुळे मतदारांकडे मतदान कार्ड नसले तरी चिंता करण्याची गरज नाही.

देशात सात टप्प्यात निवडणुका :देशातील लोकसभा निवडणुकांच्या तारखा निवडणूक आयोगानं शनिवारी (16 मार्च) जाहीर केल्या आहेत. त्यानुसार देशात सात टप्प्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक पाच टप्प्यात होणार आहे. लोकसभा निवडणुकांचा निकाल 4 जून रोजी लागणार आहे. त्यामुळं राजकीय पक्षांनी आता प्रचाराचा जोर धरलाय. सभा, घोषणांनी आता देश ढवळून निघालाय.

11 प्रकारचे ओळखपत्रांचा करू शकता वापर : मतदाराची ओळख पटवण्यासाठी पासपोर्ट, वाहन चालक परवाना, सरकारी अथवा सार्वजनिक उपक्रमातील कंपन्यांचे कर्मचारी असल्यास छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र, छायाचित्र असलेले बँकांचे/टपाल कार्यालयाचे पासबुक, पॅन कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, कामगार मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, छायाचित्र असलेले निवृत्ती वेतन दस्तावेज (पीपीओ), खासदार, आमदार, विधानपरिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र, आधार कार्ड यापैकी कोणताही एक पुरावा मतदान केंद्रावर घेऊन जाणे आवश्यक आहे.

महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान : महाराष्ट्रात लोकसभेसाठी पाच टप्प्यात मतदान होणार आहे. निवडणुकीच्या तरखांची घोषणा होताचं देशात आचारसंहिता देखील लागू झालीय. महाराष्ट्रात पाच टप्यात मतदानाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार असली तरी पहिल्या दोन टप्प्यात विदर्भातील सर्वच १० लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. विदर्भात दहा लोकसभा मतदारसंघ आहेत. त्या पैकी पहिल्या टप्प्यात पाच तर दुसऱ्या टप्प्यात पाच लोकसभा निवडणुकीचे मतदान होणार आहे.

हेही वाचा -

  1. Lok Sabha Elections : लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर; देशात सात टप्प्यात मतदान, 4 जून रोजी निकाल
  2. Lok Sabha Elections : महाराष्ट्रात पाच टप्प्यांमध्ये मतदान; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
  3. लोकसभा निवडणूक जाहीर, देशात आचारसंहिता लागू; जाणून घ्या आदर्श आचारसंहिता म्हणजे नेमकं काय?
  4. Lok Sabha Elections : देशात पहिल्यांदा ‘या’ लोकांच्या घरोघरी मतदानाची सोय, निवडणूक आयुक्तांची मोठी घोषणा

ABOUT THE AUTHOR

...view details