नवी दिल्ली LK Advani Bharat Ratna Announcement : देशाचे माजी उपपंतप्रधान तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न जाहीर झालाय. यावरुन अनेक नेत्यांनी त्यांचं अभिनंदन केलंय. मात्र वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर आणि लालकृष्ण अडवाणी यांना जाहीर झालेला भारतरत्न पुरस्कार म्हणजे एक प्रकारे फार्स आहे, असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर, एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी भाजपावर टीका केलीय. तर समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी यावर एक दावा केलाय.
प्रकाश आंबेडकरांची जोरदार टीका :भाजपाचे जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न जाहीर झाल्यानंतर वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी भाजपावर टीका करत म्हटलंय की, "लालकृष्ण अडवाणी यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन मोहम्मद जिन्ना यांच्या कबरीवर फुलं वाहिली तर त्यांना पक्षातून काढलं होतं, आता त्यांना भारतरत्न जाहीर केला म्हणजे ते दोष मुक्त झाले आहेत का?" असा सवाल प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केलाय.
ओवेसींची तिखट प्रतिक्रिया : लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न देण्याच्या घोषणेवर एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी खोचक टीका करत म्हणाले, 'लालकृष्ण अडवाणी भारतरत्नचे पात्र आहेत. हिंसाचारात प्राण गमावलेल्या भारतीयांच्या थडग्यांच्या पायऱ्यांवर चढून हा पुरस्कार मिळालाय. अशा उपरोधिक टीका त्यांनी केली. तर जमात-ए-इस्लामी हिंदचे राष्ट्रीय सचिव मलिक मोहतसिम म्हणाले की, "बाबरी मशीद पाडणाऱ्या अशा लोकांना आताच्या सरकारकडून पुरस्कार देण्याची अपेक्षा केली जाऊ शकते. या सरकारला द्वेषाच्या जोरावर आपलं राजकारण पुढं न्यायचं आहे."