पाटणा : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी राज्यसभेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद राज्यभर उमटत असल्याचं बघायला मिळतंय. याच पार्श्वभूमीवर आता आरजेडी अध्यक्ष लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांनी मोठं वक्तव्य केलंय. ते म्हणाले, "अमित शाह आंबेडकरांबद्दल जे काही बोलले ते आम्ही ऐकलं आणि पाहिलं. ते अजिबात बरोबर नाही." तसंच डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच देव असल्याचंही लालू प्रसाद यादव म्हणालेत.
नेमकं काय म्हणाले लालू यादव? : पाटणा येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, "अमित शाह वेडे झाले आहेत. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा द्वेष करतात. ते जे काही बोलले ते आम्ही ऐकलंय आम्ही पाहिलंय. त्यांचं वक्तव्य अजिबात योग्य नाही. आम्ही त्यांच्या वेडेपणाचा निषेध करतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महान व्यक्तिमत्त्व आहे. अमित शाह यांनी राजकारण सोडलं पाहिजे. त्यांनी राजीनामा द्यावा आणि निघून जावं", असं लालू प्रसाद यादव म्हणाले.
लालू प्रसाद यादव यांची प्रतिक्रिया (ETV Bharat) अरविंद केजरीवाल यांचं पत्र : दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी देखील आज (19 डिसेंबर) बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना पत्र लिहिलय. या पत्रात त्यांनी गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन जोरदार टीका केली आहे. तसंच "डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एक नेते नसून या देशाचा आत्मा आहेत", असंही केजरीवाल म्हणालेत.
पत्रात काय म्हटलंय? :केजरीवाल यांनी पत्रात असंही नमूद केलय की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमित शाह यांच्या वक्तव्याचं जाहीर समर्थन केलंय. ज्यामुळं परिस्थिती आणखी तणावपूर्ण झाली आहे. अशा वक्तव्यांमुळं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर प्रेम करणारे आता भाजपाला साथ देऊ शकत नाहीत, अशी भावना लोकांमध्ये निर्माण झाली आहे. बाबासाहेबांचा अपमान केल्याबद्दल अमित शाह यांच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी", अशी मागणीही त्यांनी या पत्रात केली आहे.
हेही वाचा -
- अमित शाह यांच्या वक्तव्याचे पडसाद; विधानभवन परिसरात 'मविआ' अन् 'महायुती'चं आंदोलन, पाहा व्हिडिओ
- "भारतीय जनता पक्ष आता जन्माला आलाय", अमित शाहांच्या बाबासाहेब आंबेडकरांसंबंधीच्या वक्तव्यावरुन प्रकाश आंबेडकर आक्रमक
- अमित शाह यांच्या विधानाचे राज्यात उमटले पडसाद; प्रकाश आंबेडकर म्हणाले, "त्यांचा जळफळाट..."