श्रीनगर : दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये जोरदार चकमक सुरू झाली आहे. दक्षिण काश्मीरच्या कुलगाममधील कादर बेहिबाग भागात मध्यरात्री दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये ही चकमक उडाली. अद्यापही या भागात चकमक सुरुच असून 5 दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आल्याची माहिती सूत्रांनी दिली. घटनास्थळावर भारतीय सैन्य दल, सीआरपीएफ आणि जम्मू काश्मीर पोलीस जवान तळ ठोकून आहेत. जवानांकडून दहशतवाद्यांचा अद्यापही शोध सुरू आहे.
दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक : सुरक्षा दलाच्या उच्च अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, भारतीय सैन्य दल, सीआरपीएफ आणि जम्मू काश्मीर पोलिसांच्या संयुक्त पथकाला या परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली. त्यामुळे सुरक्षा दलाच्या जवानांनी घटनास्थळावर धाव घेऊन शोधमोहीम राबवली. संयुक्त पथक दहशतवादी लपलेल्या ठिकाणावर जात असताना लपलेल्या दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यामुळे सैन्य दलाच्या जवानांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं. मध्यरात्री कादर बेहिबाग इथं ही चकमक सुरू झाली. दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यासाठी सुरक्षा दलांनी शोध मोहीम अधिक तीव्र केली आहे. या परिसरात अनेक दहशतवादी लपल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये जोरदार गोळीबार सुरू झाला. या चकमकीत 5 दहशतवाद्यांना ठार करण्यात आल्याची माहिती सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
सुरक्षा दलाच्या जवानांनी दहशतवाद्यांना घेरलं : कादर बेहिबाग इथं दहशतवादी लपल्याची माहिती मिळताच भारतीय सैन्य दलाच्या जवानांनी दहशतवाद्यांना घेरलं आहे. सैन्य दलाच्या जवानांनी सीआरपीएफ आणि जम्मू काश्मीर पोलिसांच्या मदतीनं घटनास्थळाला घेराबंदी केली. सध्या या परिसरात चकमक सुरू होती. सैन्य दलाचे जवानांनी दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिलं. सैन्य दलाच्या जवानांनी 5 दहशतवाद्यांना यमसदनी धाडलं आहे. सैन्य दलाचे वरिष्ठ अधिकारी चकमकीवर लक्ष ठेऊन असल्याची माहिती सैन्य दलाच्या वतीनं देण्यात आली आहे.
हेही वाचा :
- अखनूर चकमकीत फँटमला वीरमरण : सैन्य दलानं श्वानाच्या प्रशिक्षणाचा व्हिडिओ केला शेअर, सर्वोच्च बलिदानाला सलाम
- मणिपूरमध्ये सुरक्षा दलाची मोठी कारवाई; चकमकीत 11 संशयित दहशतवाद्यांचा खात्मा
- किश्तवाड चकमक : भारतीय सुरक्षा दलाच्या दोन जवानांना वीरमरण, छतरू परिसरात जवानांची दहशतवाद्यांशी चकमक - Kishtwar Encounter Update