महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

गुरांना वाचविण्याच्या प्रयत्नात कार पलटली, कोल्हापुरातील एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू - KOLHAUR FAMILY ACCIDENT IN PALI

राजस्थानमधील पाली येथे गुरुवारी रात्री झालेल्या अपघातात कोल्हापुरातील एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दाम्पत्यासह त्यांच्या दोन मुलांचा समावेश आहे.

पाली अपघात
Kolhaur family accident in Pali (Source- ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 15, 2024, 11:54 AM IST

जयपूर- पाली जिल्ह्यात गुरुवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. हे कुटुंब कोल्हापूरमधील रहिवासी होते. गुरांना वाचवण्याच्या प्रयत्नात अपघात झाल्यानंतर कार रस्त्याच्या कडेला जाऊन झुडपात पलटी झाली. रात्रीच्या अंधारामुळे त्या ठिकाणी अपघात झाल्याचे स्थानिकांना लवकर कळाले नाही.

गुरे वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचा ताबा सुटल्यानंतर कार रस्त्यावर जाऊन पलटली. संदेराव पोलीस स्टेशनचे अधिकारी लक्ष्मण सिंह यांनी सांगितले, "पोलीस स्टेशन हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग 162 वर टोल बुथपासून 1 किमी अंतरावर कार गुरांवर धडकली. त्यानंतर महामार्गावरून खाली जाऊन कार झाडावर आदळली. हा अपघात एवढा भीषण होता की या कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात दोन जण जखमी झाले आहेत. त्यांना पाली आणि संदेराव रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात कारमध्ये प्रवास करणारे मध्यमवयीन व्यक्ती, त्यांची पत्नी, मुलगी आणि मुलगा जागीच ठार झाले. कार चालवत असलेले नातेवाईक आणि पुतणे जखमी झाले."

एक किलोमीटर अंतरावर टोल प्लाझा असूनही-अपघातामधील कुटुंब हे महाराष्ट्रातील हुपरी (जि. कोल्हापूर) येथील रहिवासी आहेत. अपघातग्रस्त कुटुंब हे सोने-चांदीचा व्यवसाय करता होते. हे कुटुंब शिवगंज येथील ज्वेलर्स मित्र किशोर प्रजापत यांच्याकडे व्यवसायानिमित्त आले होते. जोधपूरहून रात्री परतत असताना त्यांच्या कारचा अपघात झाला. अपघातानंतर रस्त्यापासून 50 फूट अंतरावर असलेल्या एका झाडात कार धडकल्यानंतर कारमध्ये लोक अडकून पडले होते. हा अपघात टोल प्लाझापासून अवघ्या एक किलोमीटरवर होऊनही घटनास्थळी रुग्णवाहिका किंवा पेट्रोलिंग पथक अर्ध्या तासातही पोहोचले नव्हते. लोकांना अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमींना बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत पती-पत्नी आणि त्यांचा मुलगा- मुलगी यांचा मृत्यू झाला.

ही आहेत मृतांसह जखमींची नावे-अपघाताच्या अर्ध्या तासानंतर पोलीस टोल पथकासह घटनास्थळी पोहोचले. मात्र, तोपर्यंत कारमध्ये अडकलेले 50 वर्षीय बाबुराव, पत्नी सारिका, 19 वर्षांची मुलगी साक्षी आणि 17 वर्षांचा मुलगा संस्कार या चौघांचा मृत्यू झाला. मृत प्रवासी हे कोल्हापूर येथील पठाण कोडोली भाटा, हुपरी शहरातील कलंगडी येथील रहिवासी आहेत. कार चालवत असलेले पुरेंद्र जैन यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना बांगर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर 19 वर्षीय चिन्मय मुलगा रवी याला सांदेराव येथे दाखल करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details