महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

...तर केदारनाथमध्ये 2013 पेक्षा मोठा अनर्थ घडू शकतो; तिरुपती प्रसादाचा वाद बाबांच्या दरबारी - Kedarnath Temple Prasadam - KEDARNATH TEMPLE PRASADAM

Kedarnath Temple Prasadam : तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादाचा वाद सध्या चिघळलाय. आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याबाबत पत्र लिहिलंय. प्रसादाचा वाद हा आता इतर मंदिरांपर्यंत पोहचलाय.

Kedarnath Temple Prasadam
केदारनाथ मंदिर (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 22, 2024, 6:11 PM IST

रुद्रप्रयाग (उत्तराखंड) Kedarnath Temple Prasadam : आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसाद वादाच्या पार्श्वभूमीवर केदारनाथ तीर्थ पुरोहित समाजानं एक मोठी मागणी केलीय. केदारनाथ (Kedarnath Temple) मंदिरात वाटणाऱया प्रसादावर संशय व्यक्त केला. तसंच केदारनाथ मंदिरातील प्रसादाची तपासणी करण्याची मागणी त्यांनी केली.

प्रसादावर संशय :तिरुपती बालाजी मंदिराच्या प्रसादाचा वाद वाढतच आहे. लाडूच्या तपासणी अहवालात प्राण्यांच्या चरबीचा वापर झाल्याची माहिती समोर आल्यानंतर या प्रकरणाला वेग आला. या माहितीनंतर लोकांच्या विश्वासालाही धक्का बसला. या वादामुळं जगप्रसिद्ध केदारनाथ धामच्या यात्रेकरू, पुजारी समाजातही संतापाची लाट उसळली आहे. तीर्थ पुरोहित समाजानंही केदारनाथ (Kedarnath Temple) मंदिरात वाटणाऱया प्रसादावर संशय व्यक्त केलाय.

...तर मोठी आपत्ती :केदारनाथ धामपर्यंत पोहोचणाऱ्या प्रसादाचीही तपासणी व्हायला हवी, असं तीर्थ पुरोहित समाजाचं म्हणणं आहे. धाममध्ये असं काही घडलं तर 2013 पेक्षाही मोठी आपत्ती पाहायला मिळेल. त्यामुळं सरकारनं वेळीच याबाबत ठोस पावलं उचलण्याची गरज तीर्थ पुरोहित समाजानं व्यक्त केली. केदारनाथ तीर्थ पुरोहित समाजाचे अध्यक्ष राजकुमार तिवारी यांनी सांगितलं की, "धाममध्ये वेलचीचे दाणे, माखणा आणि सुक्या मेव्याचा प्रसाद मिळतो."

केदारनाथ मंदिराच्या प्रसादाची तपासणी व्हावी : तिरुपती बालाजी येथील प्रसादाची घटना निंदनीय असल्याचं ज्येष्ठ पुजारी उमेश पोस्ती म्हणाले. केदारनाथ धामला येणाऱ्या प्रसादाचीही तपासणी झाली पाहिजे. बाबांच्या ठिकाणी पोहोचणारा प्रसाद शहरातूनही येत असल्याचं त्यांनी सांगितलं. त्या प्रसादात काय मिळतं हे मंदिरात कोणालाच माहिती नाही. अशा स्थितीत हा प्रसादही तपासायला हवा. केदारनाथमध्ये अशी मांसाहाराची घटना उघडकीस आल्यास 2013 पेक्षा मोठा अनर्थ घडू शकतो, असंही पुजारी म्हणाले.

काय आहे प्रकरण? :आंध्र प्रदेशमधील तिरुपती मंदिराकडून देण्यात येणाऱ्या लाडूत जनावराच्या चरबीचा वापर होत असल्याच्या 'टीडीपी'च्या आरोपाला, राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डनं (NDDB) पुष्टी दिली होती. राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डनं लाडूची प्रयोगशाळेत तपासणी केली असता, तिरुपती देवस्थानला पुरविण्यात येणाऱ्या तुपात गायीसह जनावरांची चरबी आणि माशाचे तेल आढळले होते.

हेही वाचा -

  1. आंध्रचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण करणार 11 दिवसांचा उपवास; म्हणाले, "विश्वासघात झाल्यासारखं..." - Tirupati Prasad Row
  2. तिरुपती लाडूच्या तुपात जनावरांची चरबी असल्याची सरकारी लॅबकडून पुष्टी, नेमकी भेसळ कशी झाली? - tirupati laddu news
  3. तिरुपती लाडूकरिता तूप पुरविणाऱ्या डेअरीची तपासणी, भेसळ झाली नसल्याचा कंपनीकडून दावा - Tirupati Laddu Controversy

ABOUT THE AUTHOR

...view details