महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

माझ्याविरुद्ध कोणताही पुरावा नाही, हेमंत सोरेन यांचा दावा; सोरेन यांना रात्री उशिरा 'ईडी'नं केली अटक - ED Investigation

Hemant Soren : झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना बुधवारी (31 जानेवारी) रात्री उशिरा ईडीनं अटक केलीय. त्याआधी सोरेन यांनी बुधवारीच रात्री राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्याकडं मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द केला होता. यावर हेमंत सोरेन यांनी आपल्याविरुद्ध कोणताही पुरावा सापडला नसून आपला छळ करण्यात आल्याचं म्हटलं आहे.

Hemant Soren
हेमंत सोरेन

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 1, 2024, 11:51 AM IST

रांची Hemant Soren: झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना बुधवारी (31 जानेवारी) रात्री उशिरा ईडीनं अटक केलीय. दिवसभराच्या चौकशीनंतर, त्यांना अटक करण्याचा निर्णय ईडीनं घेतला. यावर हेमंत सोरेन म्हणाले की, ईडीला अद्याप माझ्याविरुद्ध कोणताही पुरावा सापडलेला नाही. त्यांनी माझ्या दिल्लीतील निवासस्थानावर छापे टाकून माझी प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केलाय. गरीब, आदिवासी, दलित आणि अत्याचार करणाऱ्यांच्या विरोधात आता नवीन लढा लढायचा आहे.

हेमंत सोरेन यांचा राजीनामा :मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी बुधवारी रात्री मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. हेमंत सोरेन यांची ईडीनं बुधवारी 7 तास चौकशी केली होती. चौकशीनंतर त्यांनी आपला राजीनामा दिला होता. त्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला होता. 'जेएमएम'चे ज्येष्ठ नेते चंपाई सोरेन यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली.

चंपाई सोरेन नवे मुख्यमंत्री? : हेमंत सोरेन यांच्या अटकेनंतर त्यांची पत्नी कल्पना सोरेन झारखंडच्या मुख्यमंत्री बनतील अशी चर्चा रंगली होती. मात्र, सोरेन यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे आपले वरिष्ठ सहकारी चंपाई सोरेन यांच्याकडं सोपवली आहेत. मनी लाँड्रिंग आणि जमीन घोटाळ्याप्रकरणी हेमंत सोरेन यांची ईडीकडून चौकशी सुरू होती. सात तासांच्या चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली. हेमंत सोरेन १५ दिवस रांचीमध्ये ईडीच्या कोठडीत राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोरेन यांनी दिल्लीतून रांचीत येत झारखंड मुक्ती मोर्चाच्या वरिष्ठ नेत्यांची आणि सहकारी आमदारांची बैठक घेतली होती. या बैठकीत चंपाई सोरेन यांना सभागृह नेता म्हणून निवडण्यात आलं व त्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

कोण आहेत चंपाई सोरेन? : मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या राजीनाम्यानंतर चंपाई सोरेन झारखंडचे नवे मुख्यमंत्री बनणार आहेत. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांची नेतेपदी निवड करण्यात आली. चंपाई सोरेन हे सोरेन कुटुंबाच्या अगदी जवळचे मानले जातात. चंपाई सोरेन सलग 4 वेळा सरायकेला विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत. याआधी त्यांना वर्ष 2000 मध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. भाजपाचे तत्कालीन उमेदवार अनंत राम तुडू यांनी त्यांचा पराभव केला होता. मात्र तेव्हापासून ते सातत्यानं विधानसभा निवडणुकीत विजयी होत आले आहेत. 2010, 2013 आणि 2019 मध्ये ते झारखंड सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीही राहिले आहेत.

हेही वाचा -

  1. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना 'ईडी'कडून अटक; राज्यात राजकीय घडामोडींना वेग
  2. कोण आहेत 'झारखंड टायगर' चंपाई सोरेन? हेमंत सोरेन यांच्या जागी बनणार राज्याचे नवे मुख्यमंत्री
  3. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचा राजीनामा, ईडीनं घेतलं ताब्यात; चंपाई सोरेन नवे मुख्यमंत्री

ABOUT THE AUTHOR

...view details