हैदराबाद Ebrahim Raisi Died :इराणचे अध्यक्ष इब्राहीम रईसी हे हेलिकॉप्टरनं अजरबैजानमधून परतत असताना त्यांचं हेलिकॉप्टर कोसळलं. त्यानंतर तब्बल 17 तासांनंतर हे हेलिकॉप्टर शोध आणि बचाव पथकाला सापडलंय. परंतु, या अपघातात रईसी यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
नेमकं काय घडलं? : मिळालेल्या माहितीनुसार, इब्राहीम रईसी हे हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते. मात्र, पूर्व अजरबैजानमध्ये जंगलात या हेलिकॉप्टरचा अपघात झाला. हा अपघातग्रस्त प्रदेश जबरीजपासून साधारण 100 किमीच्या अंतरावर आहे. प्रवासादरम्यान खराब हवामान आणि घनदाट धुक्यामुळं रईसी यांच्या हेलिकॉप्टरचं हार्ड लँडिंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, यावेळी हेलिकॉप्टर कोसळलं. या दुर्घनेत रईसी यांचं निधन झाल्याचं म्हटलं जातंय.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाहिली श्रद्धांजली : इब्राहीम रईसी यांची निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केलाय. यासंदर्भात एक्सवर पोस्ट करत मोदी म्हणालेत की, "इराणचे इस्लामिक रिपब्लिकचे राष्ट्राध्यक्ष डॉ. सय्यद इब्राहीम रईसी यांच्या दुःखद निधनानं खूप दु:ख आणि मोठा धक्का बसलाय. भारत-इराण द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यात त्यांनी दिलेलं योगदान नेहमीच स्मरणात ठेवलं जाईल. त्यांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या संवेदना आणि श्रद्धांजली. या दु:खाच्या काळात भारत इराणच्या पाठीशी उभा आहे."
हेही वाचा -
- Helicopter Crash at Cochin Airport : तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर कोचीन विमानतळावर कोसळले; एक जखमी
- Kedarnath Helicopter Crash : सेल्फी घेतला आणि मृत्यू झाला...केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेतील वेदनादायी स्टोरी
- भारतीय सैन्य दलाचं हेलिकॉप्टर शेतात कोसळलं, वैमानिकासह महिला अधिकाऱ्याला वाचवण्यात यश