हैदराबाद International Yoga Day 2024:आंतरराष्ट्रीय योग दिवस दरवर्षी २१ जून रोजी साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांच्या ६९ महासभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'आंतरराष्ट्रीय योग दिन' साजरा करण्यात यावा, असा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्राच्या १९३ देशांपैकी १७५ देशांच्या सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता. त्यानंतर ११ डिसेंबर २०१४ रोजी संयुक्त राष्ट्र महासभेनं प्रस्ताव मंजूर केला. पहिला 'आंतरराष्ट्रीय योग दिन' २१ जून २०१५ रोजी साजरा करण्यात आला. २१ जून हा उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस आहे. याला उन्हाळी संक्रांतीदेखील म्हणतात. यामुळे या दिवसाची निवड करण्यात आली.
- दरवर्षी वेगवेगळ्या थीमवर योग दिवस साजरा केला जातो. यंदाची योग थीम ही महिलांवर आधारित आहे. 'महिला सशक्तिकरणासाठी योग' ही आंतरराष्ट्रीय योग दिन २०२४ ची थीम आहे. 'आंतरराष्ट्रीय योग दिन'ची थीम काहीतरी वेगळा संदेश देणारी असते. यंदा महिलांना केंद्रस्थानी ठेवून ही थीम ठेवण्यात आलीय.
- योगची व्याख्या:योग ही मूलत: अतिशय सूक्ष्म विज्ञानावर आधारित एक आध्यात्मिक पद्धत आहे. ते मन आणि शरीर यांच्यात सुसंवाद साधारते. निरोगी जीवन जगण्याची ही कला आणि शास्त्र आहे. 'योग' हा शब्द संस्कृत मूळ 'युज' पासून आला आहे, याचा अर्थ 'सामील होणे' किंवा 'सामिल होणे' किंवा 'एकत्र होणे' असा होतो.
रोज योगाभ्यास करणाऱ्या काही प्रसिद्ध व्यक्ती
- बाबा रामदेव:भारतात योग लोकप्रिय करण्याचं श्रेय बाबा रामदेव यांना जातं. २००२ पासून ते योग योग शिबिरांचं आयोजन करतात.
- शिल्पा शेट्टी कुंद्रा:सदाबहार सौंदर्य, चमकदार त्वचा आणि टोन्ड शरीरासाठी ती योगला श्रेय देते. शिल्पा इन्स्टाग्रामवर व्हिडीओच्या माध्यमातून तिचं योग रूटीन शेअर करत असते. शिल्पानं एक समग्र आरोग्य अनुप्रयोग देखील विकसित केला आहे.
- दीपिका पदुकोण: अभिनेत्री दीपिका पदुकोणनं तिचा योग प्रवास 'डीप इनर कॉलिंग' म्हणून सुरू केला. तिनं योगावर लक्ष केंद्रित केलेल्या आदिदास मोहिमेत सहभाग घेतला. त्यामध्ये तिनं तिच्या काही आवडत्या आसनांचं प्रात्यक्षिक केलेय.
- मलायका अरोरा: मलायका तिच्या टोन्ड बॉडी आणि फिटनेस नियमानं चाहत्यांना प्रभावित करते. अभिनेत्री त्याचं संपूर्ण श्रेय योगला देते. तिला योगच्या फायद्यांचा प्रचार करण्याची खूप आवड आहे. मुंबईत तिचा योग स्टुडिओ देखील आहे.
- अक्षय कुमार: अक्षय कुमार हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात शिस्तप्रिय व्यक्तिमत्त्वांपैकी एक मानला जातो. व्यस्त वेळापत्रक असूनही, तो नेहमी योगसाठी वेळ काढतो.
- करीना कपूर खान: दररोज 101 'सूर्य नमस्कार' करणारी ही अभिनेत्री लोकांना योग आणि त्याचे फायदे सांगत असते. करीना अनेकदा तिच्या इन्स्टाग्रामवर विविध योगासनं करतानाचे फोटो पोस्ट करत असते.
- मिलिंद सोमण:मिलिंद सोमण हा मॅरेथॉन धावण्यासाठी आणि इतर ऍथलेटिक खेळांसाठी लोकप्रिय आहे. तो त्याच्या फिटनेस प्रोग्राममध्ये योगचादेखील समावेश करतो.
- शिखर धवन:भारतीय क्रिकेटपटू एकदा सांगितलं की, योगासनांमुळे त्याला मैदानावर चांगली कामगिरी करण्यात मदत झाली आहे. शिखरने तणाव व्यवस्थापनासह योगासनांचे भावनिक फायदेदेखील अधोरेखित केले आहेत.
योगच प्रकार: हठयोगासह अष्टांग योग, अय्यंगार योग, बिक्रम योग, यिन योग आणि कुंडलिनी योग हे यागाचे प्रमुख प्रकार आहेत
योगाचे फायदे
- हृदयविकाराचा धोका कमी होतो.
- चिंता दूर करते.
- रक्तदाबासंबंधीत समस्या दूर होतात.
- लवचिकता वाढते
- वजन कमी करण्यासाठी फायदेशीर.
- रोगप्रतिकार शक्ती वाढते.
- सजगतेत वाढ होते.
- पचनक्रिया सुधारते.