ETV Bharat / state

सावित्रीबाई फुले जयंती 2025: अंगावर दगड, शेण झेलून मुलींना शिक्षणाची गंगा केली खुली; जाणून घ्या सावित्रीबाईंच्या संघर्षाची कहाणी - SAVITRIBAI PHULE JAYANTI 2025

महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुलेंनी मुलींना शिक्षणाची दारं खुली केली. आज सावित्रीबाई फुलेंची जयंती, त्यानिमित्त 'ईटीव्ही भारत'च्या टीमनं त्यांच्या कार्याचा आढावा घेऊन त्यांना वाहिलेली आदरांजली.

Savitribai Phule Jayanti 2025
संग्रहित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 3, 2025, 12:55 PM IST

हैदराबाद : महिलांना चूल आणि मूल या बंधनात बंदिस्त केलेल्या समाज व्यवस्थेविरोधात महात्मा ज्योतिाब फुले आणि सावित्री फुले यांनी एल्गार पुकारला. त्यांच्यामुळे मुलींना शिक्षणाच्या गंगोत्री खुली झाल्यानं खऱ्या अर्थानं शिकून सज्ञान होता आलं. महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींना शिक्षण देण्यासाठी अगोदर सावित्रीबाई फुले यांना शिक्षित केलं. त्यामुळे सावित्रीबाई फुले या देशातील पहिल्या महिला शिक्षिका झाल्या. आज सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. सावित्रीबाई या केवळ समाजसुधारक होत्या असं नाही, तर त्या तत्त्वज्ञ आणि कवयित्रीही होत्या. त्यांच्या कविता निसर्ग, शिक्षण आणि जातिव्यवस्थेचं निर्मूलनावर केंद्रित होत्या. देशात जातीव्यवस्था शिगेला पोहोचली, त्या काळात त्यांनी आंतरजातीय विवाहांनादेखील प्रोत्साहन दिलं.

जाणून घ्या सावित्रीबाई फुले यांचा जीवन परिचय : सावित्रीबाई फुलेंचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी महाराष्ट्रातील नायगाव इथं खंडोजी नेवसे पाटील यांच्या पोटी झाला. त्या काळात मागासवर्गीयांना भेदभावाची वागणूक मिळायची. मागासवर्गीयांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. स्त्रियांना अजिबात शिकण्याची परवानगी नव्हती. पण सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण तर घेतलंच वर त्यांच्यासारख्या अनेक महिलांसाठी शिक्षणाचा मार्ग खुला केला. सावित्रीबाई लहान असताना त्यांना एक इंग्रजी पुस्तक मिळालं. त्यांच्या हातातलं पुस्तक खंडोजी पाटलांनी पाहिल्यावर त्यांनी ते हिसकावून फेकून दिलं. यावेळी त्यांनी सांगितंल की केवळ उच्च जातीतील पुरुषांनाच शिक्षणाचा अधिकार आहे. मागासवर्गीय आणि महिलांना शिक्षण घेऊ दिलं जात नाही. या गोष्टीचा लहानग्या सावित्रीबाईंच्या मनावर मोठा परिणाम झाला. पुढं ज्योती सावित्रींनी मिळून फक्त मागासवर्गीयचं नाही, तर मुलींनाही शिक्षणाची दारं खुली करुन दिली. वयाच्या अवघ्या नऊव्या वर्षी त्यांचं लग्न झालं. त्यानंतर सावित्रीबाईंनी वयाच्या 18 व्या वर्षी मुलींना शिकवायला सुरुवात केली. त्यांनी शिकवलेल्या मुली शिक्षणानंतर शाळांमध्ये शिक्षिका आणि मुख्याध्यापिका म्हणून इतरांना शिकवत होत्या.

किती होतं सावित्रीबाई फुले यांचं शिक्षण : सावित्रीबाई फुले यांना बालपणापासूनच शिक्षणाची आवड होती. मात्र, वयाच्या 9व्या वर्षी त्यांचा ज्योतिबा फुले यांच्याशी विवाह झाला. लग्न झालं तेव्हा सावित्रीबाई निरक्षर होत्या, तर ज्योतिबा फुले हे तिसरीत शिकत होते. लग्न झाल्यानतंर सावित्रीबाईंनी ज्योतिबा यांना शिक्षण घेण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे ज्योतिबांनीही त्यांना मोठ्या मनानं परवानगी दिली. सावित्रीबाईंना त्यांनी शाळेत शिकण्यास पाठवलं. लग्न झाल्यानंतर सावित्रीबाईंना शाळेत जाणं सोपं नव्हतं. त्यामुळे ज्योतिबा सावित्रीबाईंना मोठ्या विरोधाला सामोरं जावं लागलं. त्यांच्यावर दगडफेकही करण्यात आली. या दाम्पत्यावर कचरा, चिखल आणि दगडही मारण्यात आले. मात्र ज्योतिबाच्या सावित्रीनं हार मानली नाही. पुढं ज्योतिबा आणि सावित्रीबाईंनी घडवलेला इतिहास सगळ्यांना माहितीच आहे.

ज्योतिबा सावित्रीबाईंनी सुरू केली मुलींची पहिली शाळा : सावित्रीबाई फुले या शिकल्यानंतर त्यांनी अभ्यास करुन अनेक मुलींना शिक्षणाचा मार्ग मोकळा करण्याची प्रेरणा दिली. मुलींना शिक्षणासाठी संघर्ष करावा लागू नये, असा विचार सावित्रीबाई फुले यांनी केला. त्यांच्या साथीनंच ज्योतिबा फुले यांनी पुण्यातील भिडे वाड्यात 1848 साली देशातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. पुढं ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी तब्बल 18 शाळा काढल्या. त्यांच्या कार्यामुळे हजारो मुलींना शिकण्याची संधी मिळाली, त्यामुळे सावित्रीबाई यांना देशातील पहिल्या महिला शिक्षिका मानलं जाते. सावित्रीबाई फुले या पहिल्या मुख्याध्यापिकाही होत्या.

सत्यशोधक समाजाची स्थापना : महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पहिली मुलींची शाळा पुण्यात 1848 मध्ये स्थापन केली. सावित्रीबाई फुले यांनी या शाळांमध्ये शिकवलं. मुलींनी शाळा सोडू नये, यासाठी वाट्टेल ती मदत केली. दुसरीकडं ज्योतिबा अन् सावित्रीबाईंनी हुंडा पद्धतीला विरोध केला. आंतरजातीय विवाह करण्यात यावा, यासाठी ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाईंच्या साथीनं सत्यशोधक समाजाची स्थापना केली. महाराष्ट्रात प्लेग पसरल्यानंतर सावित्रीबाईंनी आपल्या मुलासह 1897 मध्ये प्लेगग्रस्तांवर उपचार करण्यासाठी पुण्यात रुग्णालय सुरू केलं. मात्र, रूग्णांची सेवा करताना त्यांना प्लेगनं ग्रासलं अन् यातच 10 मार्च 1897 रोजी देशातील लेकींची सावित्रीमायचा अंत झाला. आज सावित्रीबाई फुले यांची जयंती, त्यानिमित्त 'ईटीव्ही भारत'कडून त्यांना आदरांजली.

हेही वाचा :

  1. आता आम्हालाही मिळणार शिक्षण, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 'त्या' निर्णयावर तृतीयपंथीयांकडून जल्लोष - Free Education For Trnasgender
  2. "सावित्रीबाईंनी मुलींसाठी शिक्षणाची वाट खुली केली, तर सरकारनं 'लाडकी बहीण योजने'तून..." - CM Eknath Shinde On Phule
  3. दहा एकर जागेत सावित्रीबाईंचे भव्य स्मारक उभारणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.