मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार आमिर खानचा मुलगा जुनैद खान एका थिएटर प्लेसाठी सज्ज झाला आहे. तो आज 3 जानेवारी रोजी पृथ्वी थिएटरमध्ये थेट सादरीकरण करणार आहेत. त्याच्या अभिनयानंतर त्याचा आगामी चित्रपट 'लवयापा' चित्रपटातील पहिलं गाणं रिलीज होणार आहे. जुनैद पहिल्यांदाच पृथ्वी थिएटरमध्ये परफॉर्म करणार आहे. पृथ्वी थिएटरनं आपल्या इन्स्टाग्रामवर जुनैदच्या नाटकाची एक व्हिडिओ क्लिप पोस्ट केली आहे. यामध्ये जुनैदच्या नाटकाची वेळ, ठिकाण आणि तिकिट बुकिंगबद्दल सांगितलं गेलं आहे. ही क्लिप शेअर करताना कॅप्शन लिहिलं गेलं आहे, '3 जानेवारीला स्ट्रीक्टली अनकन्व्हेंशनल बघायला या, अपारंपरिक प्रेमकथेवर आधारित कॉमेडी.' जुनैदचे नाटक 3 जानेवारी रोजी म्हणजेच आज संध्याकाळी 6 ते 9 या वेळेत पृथ्वी थिएटरमध्ये होईल.
जुनैद खानचा थिएटर प्ले : जुनैदनं त्याच्या आगामी नाटकांविषयी एका मुलाखतीत खुलासा केला होता. 2017 पासून थिएटरमध्ये तो प्ले करत आहे. त्यानं अमेरिकेतील अकादमी ऑफ ड्रॅमॅटिक आर्ट्समध्ये थिएटर नाटकाचे प्रशिक्षण घेतलं आहे. यानंतर त्यानं 7 ते 8 नाटके केली. याशिवाय त्यानं 100हून अधिक शो केले आहेत. तसेच त्यानं 'महाराज' या शोमध्ये देखील काम केलं आहे. त्याचा हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. दरम्यान पृथ्वीराज कपूर यांनी 1944 मध्ये पृथ्वी थिएटर सुरू केले होते. हे थिएटर मुंबईतील सर्वात प्रसिद्ध नाट्यगृहांपैकी एक आहे. शशी कपूर यांनी त्यांचे वडील पृथ्वीराज यांच्या स्मरणार्थ हे थिएटर बांधले गेले होते.
'लवयापा'मधील पहिलं गाणं थिएटरमध्ये होईल रिलीज : या थिएटरमधील पहिला परफॉर्मन्स कालिदासच्या क्लासिक 'शंकुतला'चा होता. सध्या जुनैद खान त्याचा आगामी चित्रपट 'लवयापा'मुळे चर्चेत आहे. 'लवयापा' या चित्रपटामधील पहिलं गाणं आज थिएटरमध्ये रिलीज होईल. 'लवयापा' या चित्रपटामध्ये करसनदासची भूमिका जुनैद खान करणार आहे. या चित्रपटामध्ये खुशी कपूर जुनैदबरोबर पहिल्यांदा स्क्रिन शेअर करणार आहे. हा चित्रपट झी स्टुडिओद्वारे 7 फेब्रुवारी 2025 रोजी जगभरात रिलीज होणार आहे. या चित्रपटानंतर जुनैद खान साई पल्लवीबरोबर एका चित्रपटात काम करणार आहे.
हेही वाचा :
- जुनैद खान आणि खुशी कपूर दिसणार एकत्र, आगामी चित्रपटाची रिलीज डेट आणि शीर्षक आलं समोर
- आमिर खाननं राज पंडित यांंच्या 'कुडिए' गाण्याच्या लॉन्चिंग इव्हेंटमध्ये जुनैद खानची केली प्रशंसा - Aamir Khan Praises Junaid Khan
- महाराज X रिव्ह्यू : जुनैद खाननं पदार्पणातच जिंकली प्रेक्षकांची मनं, जयदीप अहलावतच्या कामावर नेटिझन्स फिदा - Maharaj X Review