रांची(झारखंड) :हेमंत सोरेन (Hemant Soren Swearing In Ceremony) यांनी झारखंडचे 14 वे मुख्यमंत्री म्हणून आज (28 नोव्हेंबर) रांची येथील मोरहाबादी मैदानावर पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. देशभरातील विरोधी राजकारणातील नेत्यांसोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनाही मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यात सहभागी होण्याचं निमंत्रण देण्यात आलं होतं.
हेमंत सोरेन यांनी झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाची घेतली शपथ; दिग्गज नेत्यांची उपस्थिती - HEMANT SOREN SWEARING IN CEREMONY
हेमंत सोरेन यांनी आज (28 नोव्हेंबर) झारखंडचे 14 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या समारंभात अनेक प्रमुख राजकीय नेते उपस्थित होते.
Published : Nov 28, 2024, 11:09 AM IST
|Updated : Nov 28, 2024, 4:36 PM IST
मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी उपस्थित :काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge), लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi), कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार (D. K. Shivakumar), तेलंगणाचे उपमुख्यमंत्री मल्लू भट्टी विक्रमार्क हे या सोहळ्याला उपस्थित होते. झारखंड काँग्रेसचे माजी प्रभारी, विधानसभा निवडणुकीचे वरिष्ठ समन्वयक बीके हरिप्रसाद, छत्तीसगडचे माजी प्रदेशाध्यक्ष मोहन मरकाम हे देखील शपथविधी सोहळ्यात सहभागी झाले होते.
हेही वाचा -
- हेमंत सोरेन यांना मोठा धक्का; नाराज माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन करणार भाजपा प्रवेश - Champai Soren To Join BJP
- झारखंडच्या राजकारणात मोठी खळबळ! "मला मुख्यमंत्रिपदावरून हटवून माझा अपमान...", नेमकं काय म्हणाले चंपाई सोरेन? - Champai Soren letter on X
- झारखंडमध्ये राजकीय उलथापालथ; फक्त १५३ दिवसात मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांचा राजीनामा, कारण काय? - CM Champai Soren Resigned