बांदा Gangster Mukhtar Ansari passed away: उत्तर प्रदेशचा माफिया मुख्तार अन्सारी याचा गुरुवारी रात्री उशिरा मृत्यू झाला. तुरुंगाच्या बॅरेकमध्ये मुख्तार अन्सारीची प्रकृती खालावल्यानं तुरुंग प्रशासनानं त्यांला राणी दुर्गावती वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केलं होतं.
गँगस्टर मुख्तार अन्सारीचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन - Gangster Mukhtar Ansari passed away - GANGSTER MUKHTAR ANSARI PASSED AWAY
Gangster Mukhtar Ansari passed away : उत्तर प्रदेशच्या माफिया मुख्तार अन्सारीचा गुरुवारी रात्री उशिरा मृत्यू झाला. बांदा तुरुंगाच्या बॅरेकमध्ये मुख्तार अन्सारी यांची प्रकृती खालावल्यानं तुरुंग प्रशासनानं त्यांना राणी दुर्गावती वैद्यकीय महाविद्यालयात दाखलं केलं होतं. त्यानंतर मुख्तारला आयसीयूमधून सीसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होतं. येथे मुख्तारच्या उपचारासाठी 9 डॉक्टरांचे पथक तैनात करण्यात आले होते.
Published : Mar 28, 2024, 11:01 PM IST
मुख्तार अन्सारीवर एकूण 61 गुन्हे दाखल : मुख्तार अन्सारी हे उत्तर प्रदेशातील मोठे बाहुबली नेते आहेत. त्यांचा जन्म 30 जून 1963 रोजी झाला. सध्या ते 60 वर्षांचे आहेत. विशेष म्हणजे त्यांचे जितके वय आहे तेवढे गुन्हे त्यांच्यावर नोंदवले गेले आहेत. त्यांच्यावर सध्या 61 गुन्ह्यांची नोंद आहे. मुख्तार अन्सारी 1996 मध्ये पहिल्यांदा बहुजन समाज पक्षाच्या तिकिटावर मऊच्या सदर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकत आमदार झाले. यानंतर त्यांनी बसपा सोडली आणि 2002 मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभेची निवडणूक जिंकली. 2007 मध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढवत ते आमदार झाले.
5 वेळा आमदार राहिले :यानंतर 2012 मध्ये मुख्तार अन्सारी यांनी कौमी एकता दलाची स्थापना केली. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मुख्तार अन्सारी यांनी वाराणसीमधून नरेंद्र मोदींविरोधात निवडणूक लढवली होती. त्यात त्यांना विजय मिळाला नाही, मात्र त्यांनी आपली ताकद नक्कीच दाखवून दिली होती. या निवडणुकीनंतर 2017 मध्ये मुख्तार अन्सारी यांनी कौमी एकता दलाचे बसपामध्ये विलीनीकरण केले. मुख्तार अन्सारी यांनी 1996, 2002, 2007, 2012 आणि पुन्हा 2017 मध्ये मऊ येथून विधानसभा निवडणूक जिंकली होती.