नवी दिल्ली : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना गुरुवारी (२६ डिसेंबर) दिल्लीच्या एम्स रुग्णालयातील आपत्कालीन विभागात दाखल करण्यात आलं आहे. ही माहिती सूत्रांनी दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 92 वर्षीय मनमोहन सिंग यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलंं. मनमोहन सिंग यांच्या फुफ्फुसात इन्फेक्शन झाल्याचं सांगण्यात येत आहे. यानंतर सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांनी लगेच एम्समध्ये जाऊन त्यांच्या प्रकृतीसंदर्भात विचारपूस केली.
मनमोहन सिंग यांना 1991 ते 1996 या काळात तत्कालीन पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये अर्थमंत्री म्हणून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली. याच काळात सिंग यांनी देशाला गंभीर आर्थिक संकटातून बाहेर काढण्यात मोलाची भूमिका बजावली. आपल्या दूरदर्शी नेतृत्वानं, त्यांनी उदारीकरण, खासगीकरण आणि जागतिकीकरण यासह महत्त्वपूर्ण आर्थिक सुधारणांचा परिचय करून दिला. त्यामुळे भारताची अर्थव्यवस्था जगासाठी खुली झाली, ज्यामुळे विविध क्षेत्रांमध्ये भरीव वाढ आणि परिवर्तन झालं.