कोलकाता Buddhadeb Bhattacharya Passed Away : पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचं गुरुवारी सकाळी दीर्घ आजारानं निधन झालं. बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांनी वयाच्या 80 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. कोलकाता इथल्या पाम एव्हेन्यू या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बुद्धदेव भट्टाचार्य यांनी आज सकाळी 08.20 वाजता अखेरचा श्वास घेतल्याच्या माहितीला त्यांचा मुलगा सूचेतना यांनी दुजोरा दिला.
पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचं निधन; वयाच्या 80 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास - Buddhadeb Bhattacharya Passed Away - BUDDHADEB BHATTACHARYA PASSED AWAY
Buddhadeb Bhattacharya Passed Away : पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचं आज सकाळी निधन झालं. बुद्धदेव भट्टाचार्य यांनी वयाच्या 80 व्या वर्षी कोलकाता इथल्या पाम एव्हेन्यू या निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला.
संपादित छायाचित्र (ETV Bharat)
Published : Aug 8, 2024, 12:01 PM IST
बुद्धदेव भट्टाचार्य सलग 11 वर्ष मुख्यमंत्री :पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य हे तब्बल 11 वर्ष सलग मुख्यमंत्री पदावर विराजमान होते. त्यांनी 2000 ते 2011 असा सलग 11 वर्षाचा कार्यकाळ मुख्यमंत्री म्हणून गाजवला आहे.