गुवाहाटी/ आसाम :PM Modi visit to Assam : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शुक्रवार (दि. 8 मार्च)रोजी दोन दिवसांच्या आसाम दौऱ्यावर पोहोचले आहेत. यावेळी, काझीरंग राष्ट्रीय उद्यान येथे ते निवास्थानी असणार आहेत. मोदी या दोन दिवसांत 18,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचं उद्घाटन करणार आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात मुक्कामी असणार आहेत, ही बातमी मिळताच काझीरंगा पार्कमध्ये मोदींना भेटण्यासाठी पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. मात्र, दोन परदेशी पिता-पुत्रांनी मोदींना विलक्षण मार्ग निवडला आहे. ते शिलाँगहून ऑटो चालवत काझीरंगाला दाखल झाले आहेत.
शिलाँग ते काझीरंगा : लेन मुइलमन आणि नाटे मुइलमन अशी या अमेरिकन पिता-पुत्रांची नाव आहेत. दरम्यान, या दोघांनी सांगितलं की, ते ईशान्य भारताच्या सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी अमेरिकेतून आले आहेत. (दि. 28 फेब्रुवारी)रोजी ते अमेरिकेतून शिलाँगला पोहोचले. शिलाँगहून ते काल गुरुवारी काझीरंगा येथे पोहोचले. नैसर्गिक सौंदर्याने भारावून जाण्याबरोबरच, पिता-पुत्र जोडीने ईशान्येकडील आणि तेथील लोकांच्या आदरातिथ्याचंही कौतुक केलं आहे.
गेंडा संवर्धनाचा संदेश : पंतप्रधान नरेंद्र मोदी काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात येत असल्याची बातमी मिळताच आपण खास काझीरंगा येथे पोहोचल्याचंही यांनी सांगितलं आहे. पंतप्रधान मोदींना भेटणं हेच आमचं उद्दिष्ट आहे असंही त्यांनी सांगितलं आहे. विशेष म्हणजे शिलाँगहून ऑटोरिक्षा खरेदी करून आणि ती स्वतः चालवून पिता-पुत्र दोघंही काझीरंगा येथे पोहोचले आहेत. त्याचबरोबर काझीरंगातील गेंडा संवर्धनाचा संदेशही त्यांच्या ऑटोवर लिहिला आहे.
तीन हेलिपॅड तयार करण्यात आले : काझीरंगातील गेंड्याच्या संरक्षणाचा मुद्दा ऑटोरिक्षात चित्रांसह मांडत पिता-पुत्र काझीरंगाच्या विविध भागात फिरत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बहुप्रतिक्षित काझीरंगा येथे शुक्रवारी होणाऱ्या आगमनासाठी सरकार, प्रशासन आणि वन विभागाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. दरम्यान, पंतप्रधानांच्या हेलिकॉप्टरच्या लँडिंगसाठी पानबारीत तीन हेलिपॅड तयार करण्यात आले होते.