महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

दिल्ली विधानसभा निवडणूक 2025 : निवडणूक आयोग थोड्याच वेळात करणार निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर - DELHI ASSEMBLY ELECTION 2025

निवडणूक आयोगानं आज दिल्ली विधानसभा निवडणूक वेळापत्रक जाहीर करण्यासाठी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आहे. थोड्याच वेळात निवडणूक आयोग विधानसभा निवडणूक 2025 वेळापत्रक जाहीर करणार आहे.

Delhi Assembly Election 2025
संग्रहित छायाचित्र (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 7, 2025, 1:02 PM IST

नवी दिल्ली :राजधानी दिल्लीत विधानसभा निवडणूक 2025 ची जोरदार रणधुमाळी सुरू झाली आहे. आगामी दिल्ली निवडणूक 2025 ची तारीख जाहीर करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोग (ECI) आज दोन वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. दिल्लीतील विधानसभा कार्यकाळ 23 फेब्रुवारीला संपत आहे. नवीन सरकार स्थापन करण्यासाठी त्यापूर्वी निवडणुका घ्याव्या लागणार आहेत. दिल्लीत एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. 2020 च्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षानं 70 पैकी 62 जागा जिंकल्या तर भाजपानं 8 जागावर बाजी मारली. मात्र यावेळी दिल्लीत वारं बदलल्याची चर्चा करण्यात येत आहे. दरम्यान दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केल्यानं संजय राऊतांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

दिल्लीत इतकी आहे मतदारांची संख्या :सोमवारी निवडणूक आयोगानं दिल्लीत सुधारित मतदार यादी प्रसिद्ध केली. या आकडेवारीनुसार मागील दोन महिन्यांत दिल्लीतील मतदारांची संख्या प्रचंड वाढली आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये एकूण मतदारांची संख्या 1 कोटी 53 लाख 57 हजार 529 होती. मात्र आता ताज्या आकडेवारीनुसार ही संख्या 1 कोटी 55 लाख 24 हजार 858 पर्यंत वाढली आहे. यात डिसेंबर 2024 पर्यंत 1 लाख 67 हजार 329 नवीन मतदारांचा समावेश होण्याची शक्यता आहे. नवीन मतदार ओळखपत्र मिळवण्यासाठी खोटी आणि बनावट कागदपत्रं सादर करणाऱ्याविरुद्ध निवडणूक आयोगानं ताकीद दिली आहे.

अरविंद केजरीवाल यांचा खळबळजनक आरोप :आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घोटाळा करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला. मतदार यादीत मतदारांचं नाव टाकणे आणि नाव काढून टाकण्यात फसवणूक होत आहे, असा आरोप अरविंद केजरीवाल यांनी सोशल माध्यमात केला. यावेळी अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्राचा हवाला दिला. मुख्यमंत्री आतिशी यांनी याबाबत निवडणूक आयोगाला पत्र लिहून पुरावे सादर करुन भेटीची वेळ मागितली.

मुख्यमंत्री आतिशी याचा लेटरबॉम्ब :दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी नमूद केलं, की मागील काही दिवसांपासून विधानसभा मतदार संघातील मतदारांना यादीत नाव टाकणे आणि कमी करण्याच्या अर्जात मोठी वाढ झाली आहे. 29 ऑक्टोबर 2024 ते 2 जानेवारी 2025 या कालावधीत एकूण 13 हजार 276 फॉर्म-6 प्राप्त झाले. तर 29 ऑक्टोबर ते 2 जानेवारीपर्यंत 6 हजार 166 फॉर्म-7 प्राप्त झाले, असा दावा त्यांनी यावेळी केला.

हेही वाचा :

  1. दिल्लीचा मुख्यमंत्री कोण होणार? संभाव्य उमेदवारांबद्दल जाणून घ्या सर्वकाही
  2. दिल्लीत प्रदूषणाची पातळी गंभीर : शाळा हायब्रिड पद्धतीनं सुरू, GRAP 4 अंतर्गत निर्बंध, काय असेल बंद?
  3. विधानसभा निवडणुकीत आप स्वबळावर लढणार, अरविंद केजरीवाल 'हाता'विना घेणार 'झाडू'

ABOUT THE AUTHOR

...view details