महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्रासाठी मोठी घोषणा; मेडिकलच्या जागा वाढवणार - EDUCATION BUDGET 2025

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शनिवारी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. यात शिक्षण क्षेत्रासाठी अनेक नवीन घोषणा करण्यात आल्या आहेत.

Union Budget 2025
केंद्रीय अर्थसंकल्प 2025 (ETV Bharat GFX)

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 1, 2025, 12:43 PM IST

Updated : Feb 1, 2025, 1:09 PM IST

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत भाजपाप्रणित एनडीएला मतदारांनी पुन्हा एकदा कौल दिल्यानं मोदी सरकार पुन्हा एकदा स्थापन झालं. मोदी सरकारच्या तिसर्‍या काळातील पहिला पूर्ण अर्थसंकल्प शनिवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitharaman) यांनी सादर केला. या अर्थसंकल्पात युवक, रोजगार आणि शिक्षण क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.

केंद्रीय अर्थसंकल्प सादर :केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शनिवारी सकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. राष्ट्रपतींना अर्थसंकल्पाची प्रत देऊन लोकसभेत अर्थसंकल्प सादर करण्याची निर्मला सीतारमण यांनी परवानगी घेतली. राष्ट्रपतींच्या भेटीनंतर निर्मला सीतारमण संसदेत दाखल झाल्या. यांनतर केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. मंत्रिमंडळानं अर्थसंकल्पाला मंजुरी दिल्यानंतर निर्मला सीतारमण यांनी 11 वाजता लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला.

शिक्षण क्षेत्राबाबत महत्त्वाचे मुद्दे :

  • भारतीय भाषा पुस्तक योजना लागू करण्यात येणार आहे. यातून शाळा व उच्च शिक्षणासाठी भारतीय भाषांमध्ये पुस्तकं उपलब्ध करून दिली जाणार आहेत. यातून विद्यार्थ्यांना त्यांचे विषय त्यांच्या भाषेत समजून घेणं सोपं जाणार असल्याचा विश्वास सरकारला आहे.
  • आयटीची क्षमता वाढवली, ६५०० जागा वाढवल्या
  • 'एआय'च्या अभ्यासासाठी तीन केंद्र उभारण्यात येणार आहेत. तसंच कृषी, आरोग्य, इनोव्हेशनमध्ये एआयचा वापर केला जाणार आहे.
  • वैद्यकीय महाविद्यालयात पुढील वर्षात 10 हजार जागा वाढवण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. तसंच पाच वर्षात 75 हजार मेडिकलच्या जागा वाढवण्यात येणार आहेत.
  • अटल टिंकरिंग लॅब - अशा ५० लाख लॅब पुढच्या पाच वर्षांत सरकारी शाळांमध्ये उभ्या केल्या जातील. सर्व सरकारी माध्यमिक शाळा व प्रायमरी आरोग्य केंद्रांना ब्रॉडबँड सेवा पुरवली जाईल.
  • गेल्या 10 वर्षांत 23 IIT मध्ये विद्यार्थ्यांची संख्या 100 टक्क्यांनी वाढली आहे. 2014 नंतर स्थापन झालेल्या पाच IIT मध्ये 6,500 विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी निधी वळवण्याचा प्रस्ताव अर्थसंकल्पात आहे. IIT पटनाचा देशात विस्तार करण्याचीही सरकारची योजना आहे.
  • पुढील वर्षी संपूर्ण भारतातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सुमारे 10,000 जागांची भर पडणार आहे. पुढील पाच वर्षांत एकूण 75,000 जागांची भर घालण्याची सरकारची योजना आहे.
  • येत्या पाच वर्षांत देशात सुमारे ५०,००० अटल टिंकरिंग लॅब स्थापन करण्याची घोषणा केली आहे. सर्व सरकारी माध्यमिक शाळांना ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी दिली जाईल.
  • ग्रामीण आणि दुर्गम भागात चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी शिक्षण देण्याच्या उद्देशाने, सरकार भारतीय भाषा पुस्तक योजनेद्वारे भारतीय भाषांमध्ये शिक्षणाला प्रोत्साहन देईल.
  • तरुणांना 'मेक इन इंडिया आणि मेक फॉर द वर्ल्ड'साठी आवश्यक कौशल्ये विकसित करण्यासाठी जागतिक कौशल्यासह देशात सुमारे पाच 'नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स'ची स्थापना केली जाईल.

हेही वाचा -

  1. निर्मला सीतारामन यांच्या घोषणेनंतर काय स्वस्त होणार, काय महाग? वाचा, सविस्तर
  2. 12 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर नाही, अर्थमंत्र्यांकडून मध्यमवर्गीयांना मोठं गिफ्ट
  3. Budget 2025 - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी जसे बजेट सादर केले तसेच्या तसे...
Last Updated : Feb 1, 2025, 1:09 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details