नवी दिल्ली- राजधानी दिल्लीत मतमोजणी सुरू झाल्यानंतर भारतीय जनता पक्षानं पोस्टल मतमोजणीपासून ट्रेंडमध्ये आघाडी घेतली आहे. आम आदमी पक्ष अनेक महत्त्वाच्या जागांवर पिछाडीवर आहे. दिल्लीत २७ वर्षांनी कमळ फुलण्याची चिन्हे आहेत.
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालात सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये भाजपाला मोठी आघाडी मिळाली आहे. त्याचवेळी आम आदमी पक्ष पिछाडीवर आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपला मोठा धक्का बसला आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया आणि माजी मंत्री सत्येंद्र जैन यांचा पराभव झाला. दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिषी यांचा विजय झाला. अरविंद केजरीवाल यांच्या पराभवानं आपच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. भाजपाच्या नेत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. भाजपाकडून सत्तास्थापनेचा दावा करण्यात येत आहे.
#WATCH | On #DelhiElectionResults, Congress candidate from the New Delhi seat, Sandeep Dikshit says, " as of now it seems that they (bjp) will form the govt... we raised the issues but i think people thought that we are not going to form the govt - we accept the decision of the… pic.twitter.com/EKv4tk70Ot
— ANI (@ANI) February 8, 2025
- कालकाजी विधानसभा मतदारसंघातील आघाडीबद्दल भाजप उमेदवार रमेश बिधुरी म्हणाले, "कालकाजीच्या लोकांचे मी धन्यवाद मानतो. ही आघाडी कालकाजीच्या लोकांची आहे. गेल्या १० वर्षांत, कालकाजीच्या लोकांनी दु:ख व्यक्त केलं. कारण परिसरात कोणतेही विकासकामे झाली नाहीत."
#WATCH | AAP candidate from Patparganj seat Avadh Ojha concedes his defeat, says, " it's my personal defeat. i couldn't connect to people... i'll meet the people and will contest the next election from here." pic.twitter.com/6UbhMljzPS
— ANI (@ANI) February 8, 2025
- जंगपुरा विधानसभा मतदारसंघातील आपचे उमेदवार मनीष सिसोदिया यांनी पराभव स्वीकारला आहे. "पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चांगली लढाई लढली. निवडणुकीसाठी आम्ही सर्वांनी खूप मेहनत घेतली. लोकांनीही आम्हाला पाठिंबा दिला. पण मी ६०० मतांनी हरलो आहे. मी विजयी उमेदवाराचं अभिनंदन करतो. मला आशा आहे, ते विधानसभा मतदारसंघासाठी काम करतील."
#WATCH | AAP candidate from Jangpura constituency, Manish Sisodia concedes defeat, says, " party workers fought well; we all did hard work. people have supported us as well. but, i lose by 600 votes. i congratulate the candidate who won. i hope he will work for the constituency." https://t.co/szW8leInSp pic.twitter.com/B1VVvsbfNI
— ANI (@ANI) February 8, 2025
- पटपरगंज मतदारसंघातील आपचे उमेदवार अवध ओझा यांनी आपला पराभव स्वीकारला. ते म्हणाले, "हा माझा वैयक्तिक पराभव आहे. मी लोकांशी संपर्क साधू शकलो नाही. मी लोकांना भेटेन आणि येथून पुढची निवडणूक लढवीन."
काँग्रेस आणि आप एकत्र असते तर...-दिल्ली निवडणुकीच्या ट्रेंडमध्ये भाजपानं आघाडीबद्दल बोलताना शिवसेना (यूबीटी) नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये कठीण लढाई दिसून येत आहे. जर काँग्रेस आणि आप एकत्र असते तर निकाल वेगळे असू शकले असते. आप आणि काँग्रेसचा राजकीय प्रतिस्पर्धी भाजप आहे. भाजपाला सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी दोघांनीही लढा दिला असता तर परिस्थिती वेगळी असते. जर ते एकत्र असते तर भाजपाचा पराभव पहिल्या तासात झाला असता.
राजद आणि काँग्रेसच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया- दिल्ली निवडणुकीच्या निकालांवर राजदे खासदार मनोज कुमार झा म्हणाले," मी निवडणूक आयोगाची वेबसाइट पाहत होतो. भाजपची आघाडी जवळजवळ निर्णायक आहे. तरीही, आपण निकालांची वाट पाहिली पाहिजे. मिल्कीपूर निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाकडे अनेक गंभीर तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. काळच या सगळ्याचं मूल्यांकन करेल. दिल्ली निवडणुकीच्या निकालांवर, नवी दिल्ली मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार संदीप दीक्षित म्हणाले, आतापर्यंत असे दिसते की ते (भाजपा) सरकार स्थापन करतील. आम्ही मुद्दे उपस्थित केले. पण मला वाटते, आम्ही सरकार स्थापन करणार नाही, असे लोकांना वाटले. जनतेचा निर्णय आम्हाला मान्य आहे."
हेही वाचा-